leopard Rescue
sakal
सिन्नर: दोडी खुर्द येथे विहिरीत पडलेल्या बिबट्याला वाचविण्यात वनविभागाला यश आले. दोन तास प्रयत्न करुन बिबट्याला विहिरीबाहेर काढले. सुभाष रखमा काळे यांच्या गट क्रमांक ३७९ मध्ये ४० फुट खोल विहिर १५ फुट पाण्याने भरलेली आहे. काळे आज विहिरीवर पंप सुरु करण्यासाठी गेले असता विहिरीतून डरकाळ्यांचा आवाज आल्याने त्यांनी डोकावून पाहिले असता बिबट्या विहिरीत पडल्याचे निदर्शनास आले.