Leopard Attacks
sakal
नाशिक
Sinnar News : आठ दिवसांत बिबट्याचा चौथा हल्ला; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
Leopard Attacks Woman in Sinnar : दोन वर्षाच्या मुलाचा बिबट्याने बळी घेतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी रविवारी सकाळी साडेदहा वाजता गिते वस्तीवर धुणे धुणाऱ्या महिलेवर बिबट्याने हल्ला केला.
सिन्नर: खडांगळी येथे दोन वर्षाच्या मुलाचा बिबट्याने बळी घेतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी रविवारी (ता.१४) सकाळी साडेदहा वाजता गिते वस्तीवर धुणे धुणाऱ्या महिलेवर बिबट्याने हल्ला केला. यात महिलेने मोठ्याने आरडाओरड केल्यामुळे व जवळ असलेली सासू मदतीला धावल्याने बिबट्याने धूम ठोकली. घटनेनंतर वनविभागाचे पथक हजर झाले.