Sinnar News : ऊसतोडणीत आढळले ३ बछडे; मादीने तीनवेळा जागा बदलली, अखेर मध्यरात्री 'ती' पिंजऱ्यात अडकली

Leopard Cubs Found for Three Consecutive Days in Sinnar : सिन्नर तालुक्यातील निमगाव-देवपूर शिवारात तीन दिवस उसात आढळलेल्या बिबट्याच्या बछड्यांसह मादीला वनविभागाने पिंजऱ्यात पकडून मोहदरी वनउद्यानात हलविले.
Leopard Cubs

Leopard Cubs

sakal 

Updated on

सिन्नर: निमगाव- देवपूर शिवारात ऊसतोडणी सुरू असताना सलग तीन दिवस बिबट्याचे बछडे आढळून आले. एकीकडे बिबट्याची मादी बछड्यांच्या सुरक्षेसाठी धडपड करत होती तर दुसरीकडे दहशत पसरल्याने वस्तीवरील शेतकऱ्यांत लहान मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न सतावत होता. वनविभागाची वाहने अडवून महिलांनी संतापाला वाट मोकळी करून दिली. अखेर मादीसह बछडे पिंजऱ्यात अडकल्यानंतर बिबट्या व मानव यांच्यातील भावनिक संघर्ष संपुष्टात आला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com