Manikrao Kokate
sakal
सिन्नर: अजितदादांनंतर पक्षाचे नेतृत्व सुनेत्रा पवार यांनीच स्वीकारावे आणि सध्या दादांकडे असलेली सत्ता व जबाबदाऱ्या सुनेत्रा वहिनींकडे सुपूर्द कराव्यात, अशी ठाम मागणी माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी केली आहे. येथे शुक्रवारी (ता. ३०) झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही भूमिका मांडली. या वेळी आमदार हिरामण खोसकर, सरोज आहिरे, नितीन पवार, विष्णुपंत म्हैसधुणे उपस्थित होते.