leopard
sakal
नाशिक
Sinnar News : सहा दिवसांच्या थरारक मोहिमेनंतर सिन्नरमधील बिबट्या पिंजऱ्यात
The rescue team had been tracking the leopard for six days : निमगाव देवपूर परिसरात दोन बालकांचा बळी घेणाऱ्या नरभक्षक बिबट्याला वनविभागाच्या रेस्क्यू टीमने यशस्वीरीत्या जेरबंद केले.
वडांगळी: निमगाव देवपूर (ता. सिन्नर) शिवारात दोन बालकांचा बळी घेणारा नरभक्षक बिबट्या अखेर सापडला आहे. सहा दिवसांपासून सुरू असलेल्या रेस्क्यू ऑपरेशनला शुक्रवारी (ता.१९) रात्री यश मिळाले. रात्री साडेनऊच्या सुमारास बिबट्या शेळीवर झडप घालताना रेस्क्यू पथकाच्या नजरेस पडला. तत्काळ गनशूटर्सनी डार्टगनने बेशुद्धीचे इंजेक्शन दिले व बिबट्याला सुरक्षितरीत्या पिंजऱ्यात पकडण्यात आले.