ढाब्याजवळ कंटेनर बेवारस स्थितीत..गायब ड्रायव्हराचा जीपीएस, मोबाईलही बंद....अखेर गुढ उकलले!

truck at night 1.jpg
truck at night 1.jpg

नाशिक / सिन्नर : संदीपने गाडीतील जीपीएस बंद केले व मोबाईलही बंद केला. ट्रान्स्पोर्ट व ट्रकमालकाने त्याला वारंवार फोन करूनही त्याचा मोबाईल बंद होता. त्यानंतर कंपनीचे व्यवस्थापक भरत मराठे यांनी याबाबत पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली होती.​ पुढे...

असा घडला प्रकार

सातपूर येथील ओके लाॅजिस्टिक प्रा.लि. ही ट्रान्स्पोर्ट कंपनी असून, येथे संशयित संदीप मुंढे (रा. वागदरवाडी, ता. आंबेजोगाई, जि. बीड) हा कंपनीत चालक म्हणून काम करतो. संदीप ४ जुलैला चेन्नई येथील वडदरम येथून अपोलो टायर्स कंपनीतून ७४९ टायर घेऊन ती दिंडोरी येथे पोचविण्याची जबाबदारी कंपनीने संदीपवर सोपविली होती. त्याकरिता संदीप ४ जुलैला कंटेनर (एनएल ०१, एबी ५९४०) घेऊन निघाला होता. ८ जुलैला संदीपने गाडीतील जीपीएस बंद केले व मोबाईलही बंद केला. ट्रान्स्पोर्ट व ट्रकमालकाने त्याला वारंवार फोन करूनही त्याचा मोबाईल बंद होता. त्यानंतर कंपनीचे व्यवस्थापक भरत मराठे यांनी याबाबत पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली होती. मराठे यांच्या तक्रारीनुसार सिन्नर पोलिसांना सिन्नरच्या हद्दीत साईबाबा ढाब्याजवळ कंटेनर बेवारस स्थितीत उभा आढळला. त्यातील ७४९ पैकी १४९ टायर गायब होते. 

चोरीसाठी काहीही....

चोरी करण्याकरीता चोरटे कोण काय शक्कल लढवतील याचा काही नेम नसतो. अशाच एका कंटेनर चालकाने चेन्नई येथून अपोलो टायर्स कंपनीतून कंटेनरमध्ये टायर्स भरून त्यातील १३ लाख ३१ हजार २६५ रुपये किमंतीची टायर्स जीपीएस, मोबाईल बंद करत परस्पर विकून टाकले. या कंटेनर चालकास सिन्नर पोलिसांनी ठाणे जिल्ह्यातून अटक केली. यावेळी पोलिसांनी संशयिताकडून त्याने विकलेले टायर्ससुद्धा जप्त केली. पथकाने तातडीने काश्‍मिरा (जि. ठाणे) येथे सापळा रचत संशयित कंटेनरचालक संदीप मुंढे याला अटक करत चौकशी केली. या वेळी त्याने लातूर, बीड, सोलापूर, नगर येथे टायर विकल्याचे सांगितले. यानंतर पोलिसांनी गायब झालेल्या १४९ पैकी १४१ टायर विकणाऱ्यांकडून ताब्यात घेतले.

चालकाच्या शोध 

पोलिस निरीक्षक साहेबराव पाटील यांनी सहाय्यक पोलिस निरीक्षक विजय माळी, पोलिस नाईक भगवान शिंदे, विनोद टिळे, समाधान बोराडे यांचे पथक चालकाच्या शोधाकरिता बीड जिल्ह्यात पाठविले असता आरोपी ठाणे येथे राहत असल्याची माहिती समोर आली.
 

संपादन - ज्योती देवरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com