Leopard
sakal
संपत ढोली- सिन्नर: तालुक्यात बिबट्यांची संख्या वाढत असून, ही बाब शेतकऱ्यांसाठी चिंतेची ठरत आहे. वर्षभरात तालुक्यात १७ बिबटे पकडण्यात वन विभागाला यश आले, तर तीन बिबटे विहिरीतून पडून मृत झाल्याच्याही घटना घडल्या आहेत. वर्षभरात आठ हल्ल्यांत तीन बालकांना जीव गमवावा लागला. पशुधनावर तर २१५ हल्ले झाले आहेत.