नागपूर : तापाच्या भीतीने लसीकरणात घट

एका दिवसात ५ कोरोनाबाधित, १०५५ जणांना सर्दी, ताप
corona vaccine
corona vaccinesakal media

नागपूर : लसीकरणाला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत असताना दिवाळीच्या काळात मात्र, नागरिकांनी तापाच्या भीतीने घरीच राहणे पसंत केले. रविवारी झालेल्या तपासणीत केवळ पाच नागरिकांना कोरोनाची बाधा झाल्याचे आढळले तर उर्वरित १ हजार ५५ जणांना सर्दी,ताप, खोकला असल्याचे आढळले.

शहरात १६ जानेवारीपासून लसीकरणाचा कार्यक्रम सुरू झाला. लस दिल्यानंतर काही लोकांना हलका ताप येण्याची समस्या होती. हा ताप दोन दिवसांत उतरतो. याशिवाय काही लोकांच्या हाताला दुखते. तो एक-दोन दिवसांत बरा होतो. लसीकरण कार्यक्रमानंतरची पहिलीच दिवाळी होती. यामुळे लोकांना लस दिल्यानंतर एक-दोन दिवसही त्रास होऊ द्यायचा नव्हता. त्यामुळेच दिवाळीच्या तीन दिवस आधीपासून लसीकरण कमी प्रमाणात झाले होते. ऑक्टोबरच्या शेवटच्या दोन दिवसांत लस घेणाऱ्यांची संख्या १० हजारांहून अधिक होती. मात्र दिवाळीच्या ३ दिवस आधीपासून ही संख्या सातत्याने कमी होत गेली. ४ नोव्हेंबरला दिवाळी असल्यानेच १ नोव्हेंबरला ८ हजार ३५१ लोकांनी लस घेतली.

corona vaccine
T20 WC : भारताच्या जावायाच्या जोरावर स्कॉटलंडसमोरही पाकिस्तानचा थाट

यात पहिला डोस घेणाऱ्यांची संख्या ३ हजार ८०५ आणि दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या ४ हजार ५४६ होती. २ नोव्हेंबरला ५ हजार ५८३ लोकांनी लस घेतली. त्यापैकी २ हजार ६०४ जणांनी पहिला तर २ हजार ७७५ जणांनी दुसरा डोस घेतला.२ नोव्हेंबरला २ हजार ७६८ व्यक्तींची लसीकरणात घट झाली होती. ३ नोव्हेंबर रोजी ही संख्या आणखी घसरली असून ४ हजार ९२७ जणांनीच लस घेतली. त्यापैकी २ हजार ५२ जणांनी पहिला तर २ हजार ७७५ जणांनी दुसरा डोस घेतला. ४ नोव्हेंबरला रोजी दिवाळी असल्याने लसीकरण बंद होते. ५ नोव्हेंबरपासून लसीकरणाच्या संख्येत वाढ झाली असून ६ हजार २५२ लोकांनी लस घेतली. त्यापैकी २ हजार ३३० जणांनी पहिला तर ३ हजार ९३५जणांनी दुसरा डोस घेतला.

आनंदावर विरजण पडू नये म्हणून...

दिवाळीच्या तीन दिवसांपूर्वी लस घेतल्यानंतर थोडासा ताप येतो. ताप आल्यास एक-दोन दिवस विश्रांती घ्यावी लागते. दिवाळीच्या सणावर विरजण पडू नये म्हणून कित्येक जण लसीकरण केंद्रावर पोहचले नाही. दिवाळीपूर्वी ३ नोव्हेंबरपर्यंत शहरात एकूण २६ लाख १२,१३७ जणांचे लसीकरण केले होते. यामध्ये पहिला डोस घेतलेल्या १६ लाख ८० हजार ६९० होती. तर दुसरा डोस घेतलेल्या व्यक्तींची संख्या ९ लाख ३१ हजार ४४७ आहे.

तारीख लसीकरण

३१ ऑक्टोबर १० हजार

१ जानेवारी ८ हजार ३५१

२ जानेवारी ५ हजार ५८३

३ जानेवारी ४ हजार ९२७

६ जानेवारी ६ हजार २५२

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com