Latest Marathi News | बहिणीचे भावाला किडनीरुपी जीवदान! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Asif Pathan and his sister

Nashik News : बहिणीचे भावाला किडनीरुपी जीवदान!

नाशिक : बहीण-भावाच्या अतूट नात्यांच्या कथा आपण नेहमीच ऐकत असतो. हे नाते घट्ट करणारी आणखी एक घटना नाशिकच्या वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये घडली असून दोन्ही किडनी निकामी झालेल्या भावाला किडनी देऊन बहिणीने आपल्या भावाला नव्या आयुष्याची भेट दिली. नेफ्रोलॉजिस्ट डॉ अनिरुद्ध ढोकरे आणि डॉ. श्याम पगार त्यांच्या टीमने ही शस्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडण्याचे आव्हान स्वीकारले. (Sister donation of kidney to brother Nashik Latest Marathi News)

नाशिक येथील असलेला ३२ वर्षीय असिफ पठाण हा तरुण दोन वर्षापासून किडनी विकाराने ग्रस्त होता. सुरवातीला एक वर्ष त्याने विविध उपचार केले परंतु त्याचा इतकासा फायदा झाला नाही, शेवटी डायलिसीस सुरू करण्यात आले. जवळपास १ वर्ष सुरू होते. किडनी प्रत्यारोपण करणे गरजेचे असल्याचे कळल्यानंतर त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. सुरवातीला केलेल्या तपासणीमध्ये दोन्ही किडन्या निकामी झाल्याचे कळले.

तरुण वयातील या रुग्णास रक्तदाबाची समस्या तसेच कोविडनंतर फुफ्फुस कमकुवत झाले होते. अशावेळी त्यांची बहीण या आपल्या भावाच्या पाठीशी भक्कमपणे उभी राहिली. अर्थात त्यांना हे बळ दिले ते त्यांच्या सासरच्या कुटुंबीयांनी. कारण अवयवदान किंवा किडनीदानविषयी समाजामध्ये अजूनही कितीतरी गैरसमज असताना किडनी दानाचे धाडस करणे ही गोष्ट सोपी नाही.

हेही वाचा : संयुक्त नावावरील गृहकर्जातून होईल प्राप्तीकराची बचत...

हेही वाचा: Nashik News : सिडकोतील विविध प्रभागातील विविध उद्याने मोजताय अखेरची घटका!

नेफ्रोलॉजिस्ट डॉ.ढोकरे, डॉ. श्याम पगार आणि त्यांच्या टीमने यशस्वी किडनी प्रत्यारोपण करून रुग्णाला नवे आयुष्य बहाल केले. या टिममध्ये नेफ्रोलॉजिस्ट ढोकरे, डॉ. पगार, युरोसर्जन डॉ. नंदन विळेकर, डॉ. प्रतिक्षित महाजन, डॉ. प्रणव छाजेड यांनी तर रक्तवाहिन्या जोडण्याचे काम डॉ राहुल कैचे यांनी केले. तसेच यामध्ये ॲनेथेसिस्ट किरणदिप संडू आणि योगेश पाटेकर यांचा देखील सहभाग होता.

आसिफ पठाण म्हणाला की या प्रत्यारोपणानंतर मी पूर्वीसारखेच आपले दैनंदिन काम करत असून आता मला कोणताही शारीरिक त्रास नाही. वोक्हार्ट रूग्णालयाच्या डॉक्टर आणि सर्व टीमने दिलेला विश्वास यामुळे मी पुन्हा नव्याने आयुष्य अनुभवतोय त्यामुळे मी त्यांचे तसेच माझ्या कुटुंबीयांचा खुपच ऋणी आहे. अवयवदान हे एक श्रेष्ठ दान आहे आणि यासाठी प्रत्येकाने जनजागृती केली पाहिजे.

हेही वाचा: Rajya Natya Spardha : आभासी प्रतिमांचा पडदा उघडणारे 'बॅलन्स शीट’

टॅग्स :NashikbrotherKidney