नाशिकच्या प्रसिध्द ‘मिसळवाल्या आजीं’ची एग्झिट; नागरिकांनी वाहिली श्रद्धांजली

Sita More
Sita MoreSakal
Updated on

जुने नाशिक : मिसळ (Misal) क्षेत्रातील जुने नाशिकच नव्हे, तर शहरात प्रसिद्ध असलेल्या ‘सीताबाईची मिसळ’च्या संचालिका सीताबाई मोरे यांचे मंगळवारी (ता. १०) सकाळी आठच्या सुमारास अल्प आजाराने निधन झाले. दुपारी साडेबाराच्या सुमारास मुख्य अमरधाममध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मिसळप्रेमींसह मान्यवर व शहराच्या विविध भागांतील नागरिक उपस्थित होते.

त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच सोशल मीडियावर त्यांच्या जीवनकार्याची चर्चा होताना दिसली. तसेच श्रद्धांजली देणाऱ्या संदेशांनी सोशल मीडिया गहिवरून गेला. सीताबाईंच्या मिसळने भुरळ घातलेले माजी आमदार वसंत गिते, माजी महापौर विनायक पांडे, नगरसेवक शाहू खैरे, प्रथमेश गिते, माजी नगरसेवक विनायक खैरे, सचिन मराठे, मिलिंद भालेराव, चंद्रकांत थोरात, कालिकामाता देवस्थानचे अध्यक्ष केशव पाटील, दिलीप वाघ, संजय चव्हाण, भिका शिंदे आदींनी काठे गल्लीतील त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन श्रद्धांजली वाहिली. तसेच त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले.

Sita More
नाशिक : घरात पेट्रोल टाकून कुटुंबाला जीवंत जाळण्याचा प्रयत्न

दरम्यान, सीताबाई मोरे ७५ वर्षांपासून मिसळ विक्रीचा व्यवसाय करीत होत्या. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत ‘मिसळवाल्या आजी’ म्हणून त्या प्रसिद्ध होत्या. जुने नाशिकसारख्या छोट्याशा भागातून त्यांनी पूर्ण शहरात मिसळ विक्रीबाबत नावलौकिक केला. नंतर अनेक मिसळ विक्रेते उदयास आले. मात्र, सीताबाईंच्या मिसळची चव काही निराळीच होती. या छोट्या व्यवसायावर त्यांनी तीन मुले आणि एका मुलीचे पालनपोषण केले.

Sita More
नाशिक शहर बससेवेची यशस्वी वाटचाल; महिनाभरातच ६५ लाखांचा महसूल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Trimbakeshwar Bhujang Tirtha Location Identified Near Brahmagiri Historians Reveal an Important Link to Ancient Traditions
Lasalgaon Nagar Parishad
Rajapur Mamdapur forest tourism Maharashtra
Aadhaar PAN Voter ID Found in Garbage
Marathi News Esakal
www.esakal.com