esakal | नाशिकच्या सिक्स सिग्मा हॉस्पिटलमधील परिस्थिती चिंताजनक; पाहा VIDEO

बोलून बातमी शोधा

six sigma hospital
नाशिकच्या सिक्स सिग्मा हॉस्पिटलमधील परिस्थिती चिंताजनक; पाहा VIDEO
sakal_logo
By
टीम-ईसकाळ

नाशिक : डॉ झाकीर हुसेन रुग्णालय मधील ऑक्सिजन गळतीमुळे श्वास गुदमरून 24 रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच नाशिकच्या सिक्स सिग्मा हॉस्पिटल मधील परिस्थिती चिंताजनक असल्याचे समजते.

ऑक्सिजन टॅंक रिकामे,रुग्ण शिफ्ट कसे करणार?

सिक्स सिग्मा रुग्णालयातील वीस रुग्णांना हलविण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती आहे आहे. ऑक्सिजन टॅंक रिकामे,रुग्ण शिफ्ट कसे करणार? हॉस्पिटल रुग्ण नातेवाईक यांच्या पुढे अनेक प्रश्न पडत आहेत.

हेही वाचा: Breaking : धक्कादायक! नाशिक शहरातील 5 हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा

पाच हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा

नाशिक शहरातील पाच हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा असल्याचे माहिती समोर येत आहे. दरम्यान नाशिक शहरातील अपेक्स, नारायणी, आयुष, नेरलीकर हॉस्पिटलला ऑक्सिजन नव्हता. नाशिक, सिन्नर हुन ड्युरा टॅंक मागवून आणि इतर हॉस्पिटलनी सिलेंडर देऊन ऑक्सिजन गरज रात्री भागवली गेली. पण आता 3 तासात सिक्स सिग्मा हॉस्पिटल मध्ये ऑक्सिजन संपतोय. नातेवाईक जमा झालेत. मुरबाड हुन टँकर येण्यास विलंब झाला. त्याचवेळी संगमनेर ऐवजी नाशिकहून मालेगाव ला ऑक्सिजन द्यावा लागत आहे. आय एम ए तर्फे ही माहिती सांगण्यात आली. सिक्स सिग्मा रुग्णालयातील वीस रुग्णांना हलविण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती आहे आहे.