Nashik Chicken Price : चिकनच्या दरात काहीअंशी वाढ; दिवाळीची सांगता होताच व्यवसायात तेजी

slight increase in price of chicken nashik news
slight increase in price of chicken nashik news

Nashik Chicken Price: दिवाळी फराळाचा गोडवा घालवण्यासाठी नागरिकांकडून मांसाहारावर ताव मारला जात आहे. मटण, चिकन विक्री दुकानांसह हॉटेलमध्ये मांसाहार करण्यासाठी गर्दी होताना दिसत आहे. दिवाळी संपताच मांसाहाराकडे सर्वांचा कल दिसून येत आहे.

त्यातच भाऊबीजनिमित्त अनेक माहेरवासीनी माहेरी आल्याने त्यांचादेखील पाहुणचार मसालेदार खमंग पंगतीने व्हावा, अशी माहेरच्यांची इच्छा असते. त्यासाठीही सर्वात पहिला पर्याय अर्थात मांसाहार हाच असतो. (slight increase in price of chicken nashik news)

शिवाय थंडीचे दिवस असल्यानेही अशा प्रकारच्या गरम पदार्थांना सर्वांची पहिली पसंती मिळत आहे. त्यानिमित्ताने मटण, चिकन, माशांची मागणी वाढली आहे. शहराच्या विविध भागातील बाजारांमध्ये चिकन, मटण दुकानांवर खरेदीसाठी गर्दी दिसून येत आहे. चिकन, मटणापासून तयार केलेले विविध पदार्थ चवीने सेवन केले जात आहे. चिकन, मटणच्या दरात काहीअंशी वाढ झाली आहे.

साडेसहाशे रुपये किलो मटण तसेच १४० ते २०० रुपयांपर्यंत चिकन विक्री होत आहे. तर शंभर रुपयांपासून आठशे रुपयापर्यंत विविध प्रकारचे मासे विक्री होत आहे. गणेशोत्सव, नवरात्रोत्सव आणि दसरा दिवाळीमुळे चिकन, मटण विक्री व्यवसाय काही प्रमाणात थंडावला होता. दिवाळीची सांगता होताच पुन्हा तेजी आल्याने विक्रेत्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

slight increase in price of chicken nashik news
Nashik Citylinc Protest: संपामुळे रिक्षाचालकांची चांदी; क्षमेतेपेक्षा अधिक प्रवासी भरून वाहतूक

हॉटेलमध्ये वेटिंग

अनेक जण विशेषतः तरुण वर्ग मांसाहार सेवन करण्यासाठी मांसाहारी हॉटेलवर गर्दी करत आहे. विविध प्रकारच्या पदार्थांना पसंती मिळत आहे. मांसाहारसाठी प्रसिद्ध असलेल्या जुने नाशिक परिसरातील विविध हॉटेलमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. अनेकांना पैसे देऊनही जेवण करण्यासाठी वेटिंगवर राहावे लागत आहे. तर काहीजण केटरर्सपासून बिर्याणी आणि पुलाव तयार करून घेत कुटुंबीयांसह पार्टी करताना दिसून येत आहे.

"दिवाळीनंतर चिकनच्या दरात दहा ते वीस रुपयांनी वाढ झाली आहे. मुख्य बाजारापेक्षा शहराच्या विविध भागात दरांमध्ये कमी अधिक प्रमाण आहे. काहीशी मागणी वाढल्याने दर वाढले आहे." -सोनू कुरेशी विक्रेता

slight increase in price of chicken nashik news
Nashik News: मराठी पाट्यांवरून मनसेचे खळखट्याक; पोलिस यंत्रणा अलर्ट

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com