Nashik Crime: औषधांच्या आडून विदेशी मद्याची तस्करी; सिनेस्टाईल पाठलागाने टेम्पोसह 44 लाखांचा मद्यसाठा जप्त

Liquor cache, tempo and suspect seized after highway chase. Including Bharari Squad of Nashik Division of State Excise.
Liquor cache, tempo and suspect seized after highway chase. Including Bharari Squad of Nashik Division of State Excise.esakal

Nashik Crime : मुंबई-आग्रा महामार्गावरील द्वारका सर्कलवर अवैधरित्या मद्याची वाहतूक करणाऱ्या टेम्पोला रोखण्याचा प्रयत्न करूनही संशयिताने गर्दीचा फायदा घेत टेम्पो उड्डाणपुलावरून आडगावच्या दिशेने पळविला.

त्यामुळे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकानेही सिनेस्टाईल पाठलाग करून टेम्पो अडविला. टेम्पोत औषधांच्या गोण्याच्या आडून विदेशी मद्याची वाहतूक केली जात असल्याचे समोर आले.

टेम्पोसह विदेशी मद्यसाठा असा ४४ लाख ८२ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. (Smuggling foreign liquor under guise of drugs 44 lakh liquor stock seized along with tempo in cinestyle chase Nashik Crime)

राज्य उत्पादन शुल्क विभागाला महामार्गावरून अवैधरित्या विदेशी मद्याची वाहतूक केली जाणार असल्याची खबर मिळाली होती. त्यानुसार पथकाने द्वारका सर्कल येथे गुरुवारी (ता. १७) सापळा रचला होता.

संशयित टेम्पो (एमएच ०४ केयु ३३६०) आला असता, त्याला दबा धरून असलेल्या पथकाने रोखण्याचा प्रयत्न केला. परंतु टेमपोचालकाने द्वारका सर्कलवरील गर्दीचा फायदा घेत टेम्पो उड्डाणपुलावरून आडगावच्या दिशेने वेगात पळविला.

पथकाच्या वाहनानेही पाठलाग सुरू केला. यामुळे उड्डाणपुलावर वाहनांचा सिनेस्टाईल पाठलाग सुरू असताना, आडगाव शिवारातील जैन मंदिरासमोर टेम्पोला वाहन आडवे लावून रोखले.

यावेळी पथकाने संशयित शाहबाज हुसेन अन्सारी (२७, रा. बढुपर, ता. मेाहनिया, जि. कैमुर, बिहार) यास अटक केली तर त्याचा साथीदार पसार झाला.

सदरची कामगिरी उपायुक्त बी.एच. तडवी, अधीक्षक शशिकांत गर्जे, उपअधीक्षक हर्षवर्धन शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथकाचे निरीक्षक जे.एस. जाखेरे, दुय्यम निरीक्षक आर.सी. केरीपाळे, एस.बी. चव्हाणके, सुनील दिघोळे, विजेंद्र चव्हाण, राहुल पवार, कैलास कसबे यांनी बजावली. निरीक्षक जाखेरे गुन्ह्याचा तपास करीत आहेत.

Liquor cache, tempo and suspect seized after highway chase. Including Bharari Squad of Nashik Division of State Excise.
Nashik Crime: मालेगावला साडेदहा लाखाचा गुटखा जप्त

भासविला औषधांचा टेम्पो

एक्साईजच्या पथकाने टेम्पोची तपासणी केली असता, टेम्पोत पॅम्पर मेडिसीन प्लॅस्टिकच्या गोण्या होत्या. खबर पक्की असल्याने संशयितांनी पथकाची दिशाभूल करण्याची शक्यता होती.

त्यामुळे पथकाने टेम्पोतील अर्धापेक्षा अधिक गोण्या उतरविल्यानंतर आतमध्ये गोण्याच्या आड दमन राज्यात निर्मिती केलेला व परराज्यात विक्रीसाठी बंदी असलेला विदेशी मद्याचे खोके होते. विदेशी मद्याचे २५० बॉक्स व बिअरचे ८० असे एकूण ३३० बॉक्स असा टेम्पोसह विदेशी मद्य ४४ लाख ८२ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल पथकाच्या हाती लागला.

Liquor cache, tempo and suspect seized after highway chase. Including Bharari Squad of Nashik Division of State Excise.
Crime News : धक्कादायक! महिलेला जिवंत पुरलं; 11 दिवसांनंतर कबर खोदून बाहेर काढलं

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com