Nashik News: बापरे! खुराड्यात नागाने प्रवेश केला अन् नागोबानं केलं असं काही की...

Snake
Snakeesakal

Nashik News : संडे हो या मंडे रोज खाओ अंडे हे आपण ऐकूनच असतो. पण कोंबड्यांची अशी अंडी खाणारा जर नागोबा असेल तर? बरं या नागोबाने एकदोन नव्हे चक्क आठ अंडी एकामागे एक अशी गिळकृंत केली. ही अदभूत घटना तालुक्यातील पिंपराळे येथील एका शेतातील कोंबडीच्या खुराड्यातली आहे.

या खुराड्यात एका विषारी नागाने प्रवेश केला. नागराजाच्या एंट्रीने कोंबड्यांनी कोलाहल करीत पळ काढला. हा प्रकार बघून शेतकरी चंद्रशेखर बापू देशमुख यांनी सर्पमित्र पवन आंधळे यांना पाचारण केले. त्यांनी या विषारी नागाला सुरक्षित रेसुक्यु केले. (snake swallowed 8 eggs at Nandgaon Nashik News)

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Snake
Video Viral : मम्मी.. मम्मी.. म्हणत राहिले लेकरं अन् डोळ्यादेखत आई गेली लाटेत वाहून; हृदय पिळवटणारी घटना

खुराड्यात ठेवलेले सोळा अंड्यांपैकी आठ अंडी फस्त केली. नागाने आठ अंडी एका मागे एक गिळाल्याने त्याची हलचाल मंदावली होती. पिंप्राळे गावातून शेत शिवारातून पवन आंधळे यांनी पावसाळा सुरू झाल्यावर महिनाभरात वीस पेक्षाजास्त विषारी बिनविषारी सर्प पकडले.

यात धामण, दिवड, नाग, मन्यार, कवड्या, तस्कर, अधि प्रजातीचा समावेश आहे. सध्या पावसाळा सुरू असल्याने सर्प गोठ्यात असो, शेतातील बंद खोलीत प्रवेश करतो. यामुळे शेतकऱ्यांने सावधगिरी बाळगून काम करावे, असे आव्हान सर्पमित्र पवन आंधळे यांनी केले आहे.

Snake
Viral Video : विद्यार्थी ग्राऊंडवर अन् मास्तर स्वप्नात! दप्तराची उशी करत गाढ झोपी गेला..

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com