नाशिकच्या स्नेहा पाडेवारची रुपेरी पडद्यावर छाप | Nashik News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sneha Padewar

नाशिकच्या स्नेहा पाडेवारची रुपेरी पडद्यावर छाप

नाशिक : नाटक, चित्रपट कलेचा वारसा लाभलेल्या नाशिकमधून राज्‍य व राष्ट्रीय पातळीवर अनेक कलावंत घडले आहेत. ही परंपरा पुढे नेताना सध्या राज्यभरात गाजत असलेल्या ‘हेरवाड पॅटर्न’ या विधवा प्रथेविरोधातील निर्णयाच्या प्रबोधनासाठी तयार केलेल्‍या ‘हेरवाड पॅटर्न’ लघु चित्रपटातून स्‍नेहाने आपल्‍या अभिनयाची छाप सोडली आहे.

लघुटपात स्‍नेहाची भूमिका अत्यंत प्रभावी ठरत असून ग्रामीण भागात ग्रामपंचायतीकडून या लघुपटाचे सार्वजनिक स्क्रीनिंग करून विधवा प्रथेविरोधात जनजागृती केली जाते आहे. तसेच, अनेक ग्रामपंचायती विधवा प्रथा बंदीचा ठराव करत आहेत. स्नेहाने यात सामाजिक कार्यकर्त्यांची भूमिका साकारत राजमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले, अहिल्यादेवी होळकर यांनी विधवा प्रथेला केलेला विरोध प्रभावीपणे मांडला आहे.

हेही वाचा: चिन्मय उदगीरकर : शंकर महाराजांची भूमिका मी साकारणार ही निव्वळ अफवा..

तिच्या अभिनयातील जिवंतपणा प्रेक्षकांच्या काळजाला भिडत असल्याने लघुपटाची लिंक समाज माध्यमातून मोठ्या प्रमाणात व्हायरल होते आहे. यातून सामाजिक प्रबोधनाचे मोठे काम होत असल्याने तिचे सर्वच स्तरातून कौतुक होते आहे.

पाथर्डी फाटा परिसरातील रहिवासी असलेले स्नेहा ही सामान्य कुटुंबातील असून म्‍हसरूळ येथील संघवी अभियांत्रिकी महाविद्यालयात पदवीचे शिक्षण घेते आहे. यापूर्वी तिने कोरोनाकाळात सेवा देताना कोरोनाने मृत्यू झालेल्या परिचारिकेची कथा ‘मदर्स’ मध्ये काम केले आहे. याशिवाय यातना, साडेग्यारा आदी चित्रपटात प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. तर व्ही. सतू व भूषण मंजुळे दिग्दर्शित संविधान तसेच आदिवासी भागातील सामाजिक विषयावरील बिंबन या मराठी चित्रपटातही ती प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. त्यामुळे स्नेहाच्या रूपाने नाशिकचे नाव महाराष्ट्रभरात पोचणार असल्‍याची प्रतिक्रिया कला क्षेत्रात उमटत आहे.

हेही वाचा: 'योगयोगेश्वर जय शंकर' मालिकेत बाल शंकराला साक्षात्कार ‘शिव अवताराचा’

"विधवा प्रथेविरोधातील ‘हेरवाड पॅटर्न’ मधील भूमिकेने समाजात प्रबोधन होत असल्याने मनाला समाधान वाटते. विधवा प्रथेविरोधात गावोगावी जाऊन ग्रामपंचायतींमध्ये जनजागृती करण्याचा मानस आहे. तशी तयारी सुरू आहे."

- स्नेहा पाडेवार, अभिनेत्री, नाशिक

Web Title: Sneha Padewar From Nashik In Acting From Herwad Patterns Short Film Impression With Her Energetic Acting Nashik News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top