'योगयोगेश्वर जय शंकर' मालिकेत बाल शंकराला साक्षात्कार ‘शिव अवताराचा’

Bal Shankara Shiva Avatar
Bal Shankara Shiva Avataresakal

नाशिक : कलर्स मराठीवरील योगयोगेश्वर जय शंकर ही मालिका सध्या अभूतपूर्व,अचंबित करणाऱ्या घटनाक्रमांमुळे प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली आहे. अवलिया सिद्धयोगी शंकर महाराज यांचा विस्मयचकित करणारा जीवन अध्याय उलगडणाऱ्या या मालिकेत सध्या शंकर महाराजांच्या बालपणाचा टप्पा उलगडतो आहे.

बाल शंकराला साक्षात्कार ‘शिव अवताराचा’
बाल शंकराला साक्षात्कार ‘शिव अवताराचा’esakal
Bal Shankara Shiva Avatar
चिन्मय उदगीरकर : शंकर महाराजांची भूमिका मी साकारणार ही निव्वळ अफवा..

दैवी लीला ही अजब असते आणि देव जेव्हा मानवी अवतारात प्रकटतो तेव्हा घडणारा ईश्वरी चमत्कार,प्रत्यय हा विलक्षण अनुभूति देणारा असतो. योगयोगेश्वर जय शंकर या मालिकेत असाच एक मोठा टप्पा येत्या २८ आणि २९ जूनला प्रेक्षकांना पाहायला मिळेल.

बाल शंकराला ‘कोsहम अर्थात मी कोण’ हा पडलेला प्रश्न श्री स्वामी समर्थांच्या एका दैवी संकेताने सोडवला जाणार असून क्षण दिव्य अनुभूतीचा, साक्षात्कार शिव अवताराचा असे अलौकिक वर्णन असलेला हा सुवर्ण क्षण प्रेक्षकांना संध्याकाळी सात वाजता कलर्स मराठीवर योग योगेश्वर जय शंकर या मालिकेत अनुभवता येईल.

Bal Shankara Shiva Avatar
घरी रामदास आठवलेच आणतात भाजी, कारण.. 'किचन कल्लाकार' मधील धमाल किस्सा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com