Sharad Pawar Group : सुप्तास्थेत विश्वासू, निष्ठावान उमेदवाराचा शोध; शरद पवार गटाचे सोशल इंजिनिअरिंग

Sharad Pawar NCP
Sharad Pawar NCP

Sharad Pawar Group : काही दिवसांपूर्वीच सत्ता स्थापनेत घडलेल्या विद्यमानांच्या राजकीय बंडानंतर देवळाली मतदारसंघात शरद पवार गट सुप्तावस्थेत सक्रिय झाला आहे. शरद पवार यांच्याशी निष्ठा असलेल्या कार्यकर्त्यांची एक फौज सध्या विश्वासू, निष्ठावान उमेदवाराचा शोध घेत आहे. देवळाली मतदारसंघात शरद पवार यांना बळ देण्यासाठी सुप्तास्थेत कार्यकर्ते कार्यरत झालेले आहेत.

सात महिन्यानंतर विधानसभेच्या निवडणुकीत काय होणार, याचा अंदाज वर्तविणे सध्या कठीण आहे. महाविकास आघाडीचा उमेदवार असेल की राष्ट्रवादी काँग्रेसचा स्वतंत्र उमेदवार असणार, यासंदर्भात स्पष्टता नाही. शिवसेना आणि राष्ट्रवादीचे उमेदवार स्वबळावर लढले तर चुरस ही निश्चित मोठी असणार आहे. (Social engineering of Sharad Pawar group in Deolali constituency nashik news)

मागील विधानसभा निवडणुकीत घराणेशाहीला कंटाळून माजी मंत्री बबन घोलप व माजी आमदार योगेश घोलप यांना मतदारांनी नाकारले होते. तीस वर्षांची घराणेशाही मतदारांनी एकी करून उलथून टाकली होती. आमदार सरोज अहिरे यांच्या रूपाने हा बदल घडून आला. मध्यंतरीच्या सत्ता स्थापनेत आमदार आहेर शरद पवार यांना सोडून अजित पवार गटात दाखल झाल्या.

हा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी आरक्षित असला तरी या मतदारसंघात मराठा समाजाचा मोठा दबदबा आहे. देवळाली मतदारसंघातील ७३ गावांमध्ये काही प्रमुख व्यक्ती सध्या शरद पवार यांच्या पाठीशी उभे राहण्यासाठी पुन्हा निष्ठावान उमेदवार पारखत आहे. यासाठी विद्यमान इच्छुक असणारे सर्वच उमेदवार मतदारसंघ पिंजून काढण्यावर भर देत आहेत. मतदारसंघातील लोकांची कनेक्टिव्हिटी, नातेगोते, मित्रपरिवार यातून नेहमीच उमेदवारांचे ब्रॅण्डिंग होत असते.

Sharad Pawar NCP
Sharad Pawar : वाजपेयींनी शरद पवारांवर टाकली होती 'ही' जबाबदारी; स्वतः पवारांनीच सांगितली आठवण

लोकसभेच्या दृष्टीने परिवर्तन घडवणारा मतदारसंघ म्हणून देवळाली ओळखता जातो. या मतदारसंघात ग्रामीण भागातल्या अनेक राजकीय दिग्गज आसामी राहतात. तसेच या मतदारसंघातील उमेदवारांची कनेक्टिव्हिटी ही कौटुंबिक सोहळे, दहावे, दुःखद घटना, लग्न वाढदिवस वर्ष श्राद्ध यातून होत असते.

सध्या सर्वच उमेदवार अशा कार्यक्रमांना हजेरी लावून संपर्क वाढवत आहेत. त्यातून तत्त्वनिष्ठ राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार शोधण्याच्या प्रयत्नांना गती आलेली दिसून येते. त्यासाठी गाव प्रमुखांची टीम ही सुप्तावस्थेत कार्यरत झाल्याचे दिसून येत आहे.

"शरद पवार हे आमचे एकमेव नेते आहेत. पक्षाचा आणि शरद पवार यांचा निर्णय आम्हाला मान्य असेल. यासाठी आम्ही स्थानिक सामान्यांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी मतदारसंघात गाठीभेटी देत आहोत. ज्येष्ठ नागरिकांचे म्हणणे पवार साहेबांपर्यंत पोचविण्यात येणार आहे." - लक्ष्मण मंडाले, प्रदेश प्रतिनिधी, राष्ट्रवादी काँग्रेस

Sharad Pawar NCP
Thackeray Group News : ठाकरे सेना फुंकणार निवडणुकीचे रणशिंग; होऊ द्या चर्चेतून सत्ताधारी कामांचा पर्दाफाश

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com