Nashik News : डॉक्टरवाडी येथील सौरऊर्जा कंपनी सील; प्रकल्पाचे कामकाज थांबविले

Seals applied to power feeders at the project site of TP Saurya Company
Seals applied to power feeders at the project site of TP Saurya Companyesakal

नांदगाव (जि. नाशिक) : तालुक्यातील वनविभागाच्या नियतन क्षेत्रात सौरऊर्जेवर आधारित विद्युत प्रकल्प उभारणाऱ्या टीपी सौर्या कंपनीवर नाशिक वनविभागाच्या पूर्व आणि वनदक्षता पथकाने संयुक्त कारवाई करत कंपनीच्या प्रकल्पातील विविध साहित्य सामग्री जप्त करत कंपनीला सील ठोकले.

सोमवारी कंपनीच्या खासगी बाउंसरकडून वनविभागाच्या कारवाईला अडथळा आणला होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी विभागाच्या मोठ्या लव्याजम्यासह शंभर जणांचा समावेश असलेल्या दक्षता पथकाने कठोर कारवाई केली.

यापुढे प्रकल्प बंद ठेवण्याची लेखी हमी कंपनीच्या व्यवस्थापनाने कारवाईनंतर वन विभागाला दिली. वन विभागाच्या कठोर कारवाईमुळे तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. (Solar Energy Company SEAL at Doctorwadi Project work stopped Nashik News)

तालुक्यातील डॉक्टरवाडी, न्यूपांझण, बाभूळवाडी भागात टीपी सौर्या या सौरऊर्जा क्षेत्रात प्रकल्प उभारणाऱ्या कंपनीकडून सहा महिन्यापासून शंभर मेगावॉट ऊर्जा निर्मितीच्या प्रकल्पाची उभारणी सुरु आहे. त्यासाठी या भागात कंपनीकडून मोठ्या प्रमाणावर भू संपादन सुरु होते मात्र वन विभागाशी निगडित क्षेत्र देखील कंपनीकडून ताब्यात घेण्यात आल्याचा मुद्दा मागील तीन महिन्यापासून वादग्रस्त ठरला होता.

किसान सभेने अतिक्रमित भूमिहीन शेतकऱ्यांना कुठल्या आधारावर काढले गेले? यावरून वन विभागाकडे सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर वनविभागाने नांदगावच्या वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांसह अन्य दोघा जणांना निलंबित करत वनक्षेत्रात येणारे काम थांबवा यासाठी कंपनीला कळविले होते. मात्र नोटीस बजावून देखील कंपनीकडून प्रकल्प उभारणे सुरु होते.

हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

Seals applied to power feeders at the project site of TP Saurya Company
Nashik News : पिंपळगाव सोसायटीचे सर्व संचालक अपात्र; जिल्ह्यातील पहिलीच घटना

अखेर मंगळवारी (ता.२८) दुपारी नाशिकहून मुख्य वनसंरक्षक नितीन गुदगे, उपवनसंरक्षक उमेश वावरे (पूर्व) यांच्या मार्गदर्शनाखाली व विभागीय वनाधिकारी विशाल माळी यांच्या नेतृत्वाखाली वनविभागाचे पथक कंपनीच्या प्रकल्प स्थळावर हजर झाले.

यावेळी सहाय्यक वनरक्षक सुजित नेवासे, परिक्षेत्र अधिकारी अधिकारी अक्षय म्हेत्रे, चांदवड वनाधिकारी संजय वाघमारे, दक्षता पथकाचे वनपरिक्षेत्र अधिकारी संजय पवार, राहुल घरटे, रवींद्र भोगे, तसेच मनमाड उपविभागातील व दक्षता पथकातील वनपाल व वनमजूर असे शंभर

जणांचा या पथकात सहभाग होता. नायब तहसीलदार चेतन कोणकर व महसूल पथक यावेळी उपस्थित होते. कारवाईवेळी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला होता.

Seals applied to power feeders at the project site of TP Saurya Company
Nashik News : रानमळ्यात बहरला नवचैतन्यदायी पळसराज!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com