Solar Power
sakal
नाशिक: ‘महावितरण’च्या नाशिक परिमंडळांतर्गत नाशिक व अहिल्यानगर जिल्ह्यांत मुख्यमंत्री सौरकृषी वाहिनी, तसेच पंतप्रधान सूर्यघर मोफत योजनेच्या माध्यमातून ५६१.३१ मेगावॉट वीजनिर्मिती होत आहे. उत्पादित वीज शेती आणि घरगुती वापरासाठी उपयुक्त ठरते. त्यामुळे जीवाश्म इंधनावरील अवलंबित्व कमी होतानाच सौरऊर्जेमुळे पर्यावरणाच्या रक्षणालाही हातभार लागत आहे.