मुलींचा जन्मदर घटला; सोनोग्राफी केंद्रांवर ठेवली जाणार नजर

girls birth rate
girls birth rategoogle

नाशिक : शहरात मुलींचा जन्मदर घटत असल्याने शहरात कार्यरत असलेल्या ३१६ सोनोग्राफी केंद्रांवर महापालिकेकडून नजर ठेवली जाणार आहे. एक किंवा दोन मुली असलेल्या गर्भवतींचे आशासेविकांमार्फत निरीक्षण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. चार वर्षांत शहरात मुलांच्या तुलनेत मुलींच्या जन्माचे प्रमाण जवळपास सारखे होते. परंतु कोरोना संसर्गाच्या काळात हे प्रमाण घटल्याची बाब वैद्यकीय विभागाकडे प्राप्त झालेल्या आकडेवारीतून स्पष्ट झाली.


शहरात दर हजार मुलांच्या मागे मुलींच्या जन्माचे प्रमाण ९२५ इतकेच आढळून आले. त्यामुळे शहरातील सोनोग्राफी केंद्रामधून गर्भलिंग निदान व स्त्रीभ्रूणहत्येचे प्रकार होत असल्याचा संशय बळावला आहे. त्यामुळे शहरातील सोनोग्राफी केंद्रांवर नजर ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एक किंवा दोन मुली असलेल्या गर्भवतींवर आशासेविकांच्या माध्यमातून नजर ठेवली जाणार आहे. गर्भनिदान किंवा स्त्रीभ्रूणहत्या होत असल्याचे लक्षात आल्यास ‘गर्भधारणापूर्व आणि प्रसूतिपूर्व निदान तंत्र (गर्भलिंग निदान प्रतिबंध) कायदा, २००३ अंतर्गत कारवाई केली जाणार आहे. शहरात ५५६ सोनोग्राफी केंद्रांची नोंदणी करण्यात आली आहे. त्यातील २१६ सोनोग्राफी केंद्रे कायमस्वरूपी बंद करण्यात आली आहेत. बारा सोनोग्राफी केंद्रांवर विविध कारणांमुळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या बंद असलेल्या केंद्रांना अचानक भेटी देऊन तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचबरोबर कार्यरत असलेल्या ३१६ केंद्रांवरही नजर ठेवली जाणार आहे.

girls birth rate
नाशिक : भाजप कार्यालय तोडफोड प्रकरणी अखेर शिवसैनिकांना जामीन



शहरात स्री-पुरुष जन्माचे प्रमाण (वर्षनिहाय)
वर्ष पुरुष स्त्री
२०१७ - ११७०१ १०६१९
२०१८ - १४,४८२ १३३७३
२०१९ - २२०२१ २०२६४
२०२० - २२६७१ १९५५३
जून २०२१ - ४८४४ ४३६८

दर हजार मुलांमागील मुलींचे प्रमाण
दर हजार मुलांमागे मुलींचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर घसरले आहे. २०१७ मध्ये हजार मुलांच्या मागे मुलींचे प्रमाण ९०७ इतके आहेत. तसेच २०१८ मध्ये हजार मुलांमागे मुलींची संख्या ९२३, २०१९ मध्ये ९२०, २०२० मध्ये हेच प्रमाण ९१२ तर जून २०२१ पर्यंत म्हणजे सहा महिन्यांतील मुलींचे प्रमाण हजार मुलांमागे ९०२ इतके खाली आले आहे.


आशासेविकांमार्फत एक किंवा दोन मुली असलेल्या गर्भवती महिलांवर विशेष लक्ष ठेवले जाणार आहे. वैद्यकीय कारणाव्यतिरिक्त गर्भपात झाल्यास संबंधित प्रसूतिगृह चालकांची चौकशी होईल.
- डॉ. बापूसाहेब नागरगोजे, वैद्यकीय अधीक्षक, महापालिका

girls birth rate
रस्ता चुकल्याने गुजरातचे पर्यटक रात्रभर किल्ल्यावरच

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com