उद्धव ठाकरेंच बोलणं, न उगवलेल्या बियाण्यासारखंच! : सदाभाऊ खोत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sadabhau Khot & CM Uddhav Thackeray

उद्धव ठाकरेंच बोलणं, न उगवलेल्या बियाण्यासारखंच! : सदाभाऊ खोत

येवला (जि. नाशिक) : मतदारांनी भाजप- शिवसेनेला (BJP-Shivsena) सत्तेसाठी बहुमत दिले परंतु विश्वासघात करून शिवसेना सत्तेवर आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) असले तरी ते नामधारी असून त्यांच्या बोलण्याला कुठलाही अर्थ नाही. पेरूनही न उगवलेल्या बियाण्यासारखं त्यांचं बोलणं असून त्याला पीक येत नाही अशी टीका रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष, माजी मंत्री सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी केली. ‘आक्रोश महाराष्ट्राचा’ या दौऱ्यात आज येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते. महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi Government) व मुख्यमंत्र्यांवर त्यांनी जोरदार टीका केली. (Speaking of Uddhav Thackeray like seed thats not sprouted Sadabhau Khot cirtcism Nashik News)

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj thackeray) सध्या भाजपच्या बाजूने बोलताय, त्यामुळे भविष्यात मनसे-भाजप एकत्र येतील का या प्रश्नावर बोलताना खोत म्हणाले, राज ठाकरेंनी लोकसभेच्या निवडणुकीवेळी ‘लाव रे तो व्हिडिओ’ म्हटले, की राष्ट्रवादी व काँग्रेसवाले टाळ्या वाजवत होते. आता त्यांनी गाडा रे यांना मातीत म्हटल्याबरोबर ते भाजपकडे निघाल्याचे म्हटले जातेय. आता पोटात कळा सुटायला लागल्या? तेव्हा हसू येत होतं, आता काय नववा महिना लागला का? म्हणून रडू येऊ लागले अशी बोचरी टीका खोत यांनी केली.

हेही वाचा: 'या' गावात गावकरी घेतात नदीपात्रात पोहण्याचा आनंद

राणा दांपत्याबाबत खोत म्हणाले, त्यांच्यावर राजद्रोहाचा दाखल केलेला गुन्हा चुकीचाच होता. या सरकारच्या विरोधात जर कोण बोललं तर त्याला आम्ही तुरुंगात टाकून त्याच्यावर कोणत्या पद्धतीचे गुन्हे लावू असा कारभार सुरू आहे. मुख्यमंत्री हे भगव्यातून आता हिरव्यात आल्याने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेच्या (Balasaheb Thackeray) स्वप्नाचा चक्काचूर झाला आहे. मुख्यमंत्र्यांनी जरा घराबाहेर पडाव अन जनतेचे काळजी घ्यावी.

हेही वाचा: मालकाने बांधले चक्क गायीचे मंदिर

आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या अयोध्या दौऱ्यावही त्यांनी टीका केली. गावामध्ये पवार, देशमुख, पाटील, जाधव अशा नावाने लोक ओळखले जातात. पण काही लोकांना सांगावे लागते की, मी पाटील आहे. तशीच त्यांची अवस्था झाली असून पाटीलकी दाखविण्यासाठी ही धडपड सुरू असल्याची टीकाही ठाकरेवर केली.

भाजपकडूनच केले नेतृत्व

माजी मंत्री एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी मुख्यमंत्रिपदाबाबत केलेल्या वक्तव्यावर ते म्हणाले, खडसेनी बहुजनांचे नेतृत्व अनेक वर्षे भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून या राज्यात केलेले आहे. भाजपा हा बहुजनांचा, तळागाळातल्या जनतेचा अन कार्यकर्त्यांना मानसन्मान देणारा पक्ष असल्याचे खोत म्हणाले.

Web Title: Speaking Of Uddhav Thackeray Like Seed Thats Not Sprouted Sadabhau Khot Cirtcism Nashik News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top