'या' गावात गावकरी घेतात नदीपात्रात पोहण्याचा आनंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Swimming

'या' गावात गावकरी घेतात नदीपात्रात पोहण्याचा आनंद

चांदोरी (जि. नाशिक) : आपल्याकडे पैसे देऊन शिबिरात पोहण्याचा प्रकार अलीकडचा. त्यापूर्वी नदी, विहीर, तलाव या ठिकाणी सहज पोहण्याचे धडे आपल्याला मिळत. एकदा पाण्यात पडले, की पोहायला येते ही जुनी म्हण कदाचित त्याचमुळेच पडली असावी. पोहणे शिकायचे, पण अपघात होऊ नये म्हणून काळजी घेणेही तेवढेच महत्त्वाचे आहे.

काही दिवसांपासून कडक उन्हामुळे अंगाची काहिली होत आहे. त्यामुळे उन्हाळा सुसह्य करण्यासाठी पोहण्याला पसंती देतात. ग्रामीण भागात स्वीमिंग टँक म्हणजे गोदावरी नदी पात्रच, अशी भावना गोदावरी नदीकाठच्या चांदोरी गावातील मुलांची. ग्रामीण भागातील मुलांना महागडे स्वीमिंग टँक परवडत नाहीत. त्यामुळे उन्हाची काहिली वाढली, की धोकादायक असले तरीसुद्धा नदीत पोहण्याचा आनंद घेतात. विहीर, नदी, कालव्यात पोहणे नेहमी असुरक्षित असते, ही बाब वारंवार सांगितली जाते. मात्र, चांदोरीसह जिल्हा पातळीवर आपत्ती व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून काम करत असलेल्या सागर गडाख, विलास सूर्यवंशी, किसन जाधव यांसह त्यांचे सहकारी नाममात्र दरात पोहोण्याचं प्रशिक्षण देताय. नदीमध्ये बुडून किंवा व वाहून गेल्याने मृत्यू झाल्याच्या बातम्या दर वर्षी वाचनात येतात. तेवढ्यापुरती काळजी घेतली जाते. मात्र, त्यातून कायमस्वरूपी बोध घेतला जात नाही, ही बाब दुर्दैवी आहे, असे असले तरी योग्य मार्गदर्शन आणि पुरेशा साधनातून पोहण्याचं प्रशिक्षण आत्मसात करायला हवं, असे उल्हास कदम यांनी सांगितले.

हेही वाचा: रॉकेल मिळेना आणि गॅस परवडेना; सामान्य गृहिणींना बसतोय फटका

''मुलांना विश्‍वासात घेऊन त्यांना पोहण्यास शिकवले जात असून, मुलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने लाइफ जॅकेट किंवा पोहोताना दमले, तर पाण्यावर तरंगण्यासाठी सहायक ठरेल, अशी साधने वापरली जात आहेत.'' - सागर गडाख, अध्यक्ष,आपत्ती व्यवस्थापन समिती

हेही वाचा: नाशिक : ब्रिटिश काळातील बंधारा दुरुस्तीमुळे शेतीपिकांना नवसंजीवनी

Web Title: Villagers Of Chandori Village Swim In Godavari River Nashik News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top