Latest Marathi News | नागपूर- मुंबई दरम्यान दिवाळीनिमित्त विशेष गाड्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Train

Nashik : नागपूर- मुंबई दरम्यान दिवाळीनिमित्त विशेष गाड्या

नाशिक रोड : दिवाळी सुटीसाठी मध्य रेल्वे विशेष शुल्क आकारून नागपूर ते मुंबई दोन एकेरी विशेष गाड्या चालवणार आहे, त्यामुळे प्रवाशांसाठी प्रवासाची नवी पर्वणी निर्माण झाली आहे. (Special trains between Nagpur Mumbai on occasion of Diwali Nashik News)

हेही वाचा: Diwali Festival 2022 : दिवाळी खरेदीसाठी शहरात गर्दीच गर्दी!

नागपूर-मुंबई सीएसटी वन वे स्पेशल ०१०७६ सुपरफास्ट १५ ऑक्टोबरला नागपूरहून १३.३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी ४ वाजता मुंबई सीएसटी येथे पोहोचेल. वर्धा, धामणगाव, बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, मनमाड, नाशिक रोड, कल्याण, ठाणे आणि दादर येथे ती थांबेल. नागपूर- मुंबई एलटीटी वन वे स्पेशल ०१०७८ सुपरफास्ट गाडी १८ ऑक्टोबरला नागपूरहून १३.३० वाजता सुटेल आणि दुस-या दिवशी ३.५० वाजता एलटीटी मुंबई येथे पोहोचेल.

वर्धा, धामणगाव, बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, मनमाड, नाशिक रोड, कल्याण आणि ठाणे येथे ती थांबेल. दोन द्वितीय वातानुकूलित, ८ तृतीय वातानुकूलित, ४ शयनयान, ५ सामान्य व्दितीय श्रेणी अशी या गाड्यांची रचना आहे. बुकिंग सर्व पीआरएस स्थानांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर सुरू झाले आहे.

हेही वाचा: SAKAL- NIE : कल्‍पकतेतून साकारले रंगबिरंगी आकाशकंदील!