नाशिक : ‘शिवभोजन’च्या तपासणीसाठी पथके ; छगन भुजबळ

छगन भुजबळ : केंद्रांवर सीसीटीव्ही बसविण्यास महिन्यांची मुदतवाढ
Squads to check Shivbhojan Chhagan Bhujbal
Squads to check Shivbhojan Chhagan Bhujbalsakal

नाशिक : शिवभोजन केंद्राच्या तक्रारी लक्षात घेता नियमांचे पालन न करणाऱ्या शिवभोजन केंद्रांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश अन्न-नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ यांनी आज दिले. तसेच थाळीच्या गुणवत्ता तपासणीसाठी अधिकाऱ्यांची पथके तयार करा, अशी सूचना करत त्यांनी गुणवत्तेमध्ये कोणत्याही प्रकारची हलगर्जी सहन केला जाणार नाही, असा इशारा दिला. (Shiv Bhojan Thali News Updates)

मुंबईतील मंत्रालयामधील दालनात शिवभोजन थाळी योजनेसंबंधी आढावा बैठक झाली. त्या वेळी श्री. भुजबळ बोलत होते. अन्न-नागरी पुरवठा विभागाचे सचिव विजय वाघमारे, सहसचिव सुधीर तुंगार, चारुशीला तांबेकर व इतर अधिकारी उपस्थित होते. श्री. भुजबळ म्हणाले, की शिवभोजन योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रत्येक शिवभोजन केंद्रावर सीसीटीव्ही बसविण्याचे नियोजित आहे. या कामासाठी ३१ जानेवारीपर्यंत मुदत होती. मात्र प्रत्येक शिवभोजन केंद्रचालकांच्या मागणीनुसार या कामाला थोडा अवधी वाढवून मिळावा, अशी मागणी होती. हे लक्षात घेता प्रत्येक शिवभोजन केंद्रावर सीसीटीव्ही बसविण्यासाठी एक महिन्याचा अवधी वाढवून देण्यात आला आहे.

केंद्रावरील छायाचित्र करायचे अपलोड

शिवभोजनचालकांना शिवभोजन थाळीचा लाभ घेणाऱ्या व्यक्तीचे छायाचित्र एका ॲप्लिकेशनमध्ये अपलोड करण्याचा नियम राज्य सरकारने केला आहे. मात्र या प्रणालीचा गैरवापर होत असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. त्यामुळे येथून पुढे छायाचित्र अपलोड करण्यासाठी शिवभोजन केंद्रापासून १०० मीटर मर्यादा आखून दिली आहे, असेही श्री. भुजबळ यांनी सांगितले.

सव्वाआठ कोटींहून अधिक थाळी

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून राज्यातील गरीब जनतेला दहा रुपयांत पोटभर जेवण उपलब्ध व्हावे, या उद्देशाने शिवभोजन ही योजना २६ जानेवारी २०२० ला सुरू करण्यात आली. बुधवार, ९ फेब्रुवारी २०२२ पर्यंत आठ कोटी ३४ लाख ९५ हजार ८५७ शिवभोजन थाळ्यांचे वितरण करण्यात आले आहे. सध्या राज्यात एक हजार ५२१ शिवभोजन केंद्र आहेत. टाळेबंदीच्या कालावधीत अडीच कोटी शिवभोजन थाळ्यांचे मोफत वितरण करण्यात आले आहे, अशीही माहिती श्री. भुजबळ यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com