SSC Exam 2023 : मराठीच्या पेपरला विभागात 4762 विद्यार्थ्यांची दांडी! 2 ठिकाणी गैरमार्गांचा अवलंब | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

SSC Exam 2023

SSC Exam 2023 : मराठीच्या पेपरला विभागात 4762 विद्यार्थ्यांची दांडी! 2 ठिकाणी गैरमार्गांचा अवलंब

Nashik News : बारावीपाठोपाठ राज्य शिक्षण मंडळाच्या दहावी बोर्डाच्या परीक्षेस गुरुवारी (ता. २) सुरवात झाली. मराठी भाषा विषयाच्या पेपरला नाशिक विभागात एक लाख ५५ हजार २२४ विद्यार्थ्यांनी हजेरी लावली, तर चार हजार ७६२ विद्यार्थ्यांनी दांडी मारली.

दरम्यान, नाशिक विभागात धुळे व नंदुरबार या जिल्ह्यांत प्रत्येकी एक गैरमार्ग प्रकरणाची नोंद झाली. (SSC Exam 4762 students in Marathi paper section copy case in 2 places nashik news)

नाशिक जिल्ह्यात ६९ हजार २० विद्यार्थ्यांनी हजेरी लावली, तर एक हजार ६०७ विद्यार्थी गैरहजर राहिले. मराठी विषयाच्या पेपरची काठिण्य पातळी कमी असल्याचेही विद्यार्थ्यांनी सांगितले. गैरप्रकार रोखण्यासाठी मंडळाकडून चार भरारी पथकांची नियुक्ती केली आहे.

विभागात पहिल्याच दिवशी मराठीच्या पेपरला दोन गैरप्रकार आढळले असून, विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. परीक्षेच्या शेवटी वाढवून दिलेल्या दहा मिनिटांचा फायदा झाल्याच्या प्रतिक्रिया परीक्षार्थींनी व्यक्त केल्या. पहिला पेपर सुरळीत पार पडल्याचा आनंद विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसून आला.

जिल्हा नोंदणी झालेले विद्यार्थी उपस्थित गैरहजर

नाशिक ७० हजार ५८० ६९ हजार २० १ हजार ६०७

धुळे २४ हजार १०१ २३ हजार १२ १ हजार ११३

जळगाव ४७ हजार ८७ ४६ हजार १०१ १ हजार २६

नंदुरबार १७ हजार ८७२ १९ हजार ९१ १ हजार १६

एकूण एक लाख ५९ हजार ६४० एक लाख ५५ हजार २२४ चार हजार ७६२

हेही वाचा : बँक खात्याला जोडलेल्या सिमकार्डबाबत बाळगा ही काळजी...

* विभागातील १२६ विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोचण्यास उशीर

* विभागात दोन ठिकाणी गैरमार्गांचा अवलंब

* नाशिक जिल्ह्यात एकही कॉपीकेस नाही

* शेवटच्या दहा मिनिटांच्या वाढीव वेळेचा विद्यार्थ्यांना फायदा

* पहिलाच पेपर सुरळीत गेल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद

* परीक्षा केंद्रात विद्यार्थ्यांसाठी आवश्यक सुविधा

* विद्यार्थ्यांसह पालकांची परीक्षा केंद्रावर हजेरी