Latest Marathi News | 12वीची 21 फेब्रुवारीपासून; 2 मार्चपासून 10वीची परीक्षा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Exam timetable

12वीची 21 फेब्रुवारीपासून; 2 मार्चपासून 10वीची परीक्षा

नाशिक : महाराष्ट्र राज्‍य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे इयत्ता दहावी, बारावीच्‍या परीक्षांचे संभाव्‍य वेळापत्रक जाहीर केले आहे. त्‍यानुसार २०२३ मध्ये होणारी बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारीपासून तर दहावीची परीक्षा २ मार्चपासून होणार आहे. वेळापत्रकासंदर्भात येत्‍या पंधरा दिवसांत हरकत, सूचना नोंदविता येणार आहेत. (SSC HSC Exam exam Dates Nashik Latest Marathi News)

हेही वाचा: मृत्यूनंतरही वेदना धगधगत्या; चंडीकापूर येथे रस्त्यावरच अंत्यविधी!

शैक्षणिक वर्ष २०२२-२३ अंतर्गत दहावी, बारावीच्‍या परीक्षा फेब्रुवारी-मार्च २०२३ मध्ये घेण्याचे नियोजित आहे. राज्‍यातील नऊ विभागांमध्ये ही परीक्षा घेतली जाणार असून, त्‍यासाठी काही दिवसांपूवीच ऑनलाइन पद्धतीने परीक्षा अर्ज भरण्याची प्रक्रिया राबविण्यात आली होती. शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांना तसेच विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाचे नियोजन करता यावे, या उद्देशाने तसेच विद्यार्थ्यांच्‍या मनावर परीक्षेचा ताण येऊ नये, यासाठी लेखी परीक्षांचे संभाव्‍य वेळापत्रक जाहीर केले आहे.

परीक्षेपूर्वी शाळा, महाविद्यालयांकडे छापील स्‍वरुपात दिले जाणारे वेळापत्रक अंतीम राहिल, असे शिक्षण मंडळाने स्‍पष्ट केले आहे. प्रात्‍यक्षिक परीक्षा, श्रेणी, तोंडी परीक्षा व अन्‍य परीक्षांचे वेळापत्रक स्‍वतंत्रपणे परीक्षेपूर्वी जाहीर केले जाणार असल्‍याचेही कळविले आहे. तसेच वेळापत्रकाबाबत काही सूचना, हरकती असल्‍यास विभागीय मंडळाकडे तसेच राज्‍य मंडळाकडे १५ दिवसांच्‍या आत लेखी स्‍वरुपात कळविता येणार आहेत. त्‍यानंतर प्राप्त होणार्या सूचनांचा विचार होणार नसल्‍याचेही स्‍पष्ट केले आहे.

-बारावीचा परीक्षा कालावधी- २१ फेब्रुवारी ते २० मार्च २०२३

-दहावीचा परीक्षा कालावधी - २ ते २५ मार्च २०२३

हेही वाचा: कौटूंबिक वादातून वृद्धाची गोदावरीत उडी; जीवरक्षकामुळे वाचले प्राण

Web Title: Ssc Hsc Exam Exam Dates Nashik Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..