हॉटेल मालकाने बळजबरीने ग्राहकाकडून घेतला ८० हजारांचा ऐवज; मालकावर गुन्हा दाखल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

hotel table.jpg

अजय भालेराव हे एसएसके हॉटेलमध्ये जेवायला गेले असता तेथे टेबल बुकिंगवरून हॉटेल मालक कुटे व व्यवस्थापक अविनाश यांनी १० ते १५ जण जमवून  ३० हजारांची सोन्याची साखळी, ५० हजारांचा आयफोन, असा सुमारे ८० हजारांचा ऐवज बळजबरीने काढून घेतला. काय घडले नेमके?

हॉटेल मालकाने बळजबरीने ग्राहकाकडून घेतला ८० हजारांचा ऐवज; मालकावर गुन्हा दाखल

नाशिक :अजय भालेराव हे एसएसके हॉटेलमध्ये जेवायला गेले असता तेथे टेबल बुकिंगवरून हॉटेल मालक कुटे व व्यवस्थापक अविनाश यांनी १० ते १५ जण जमवून  ३० हजारांची सोन्याची साखळी, ५० हजारांचा आयफोन, असा सुमारे ८० हजारांचा ऐवज बळजबरीने काढून घेतला. काय घडले नेमके?

हॉटेल मालकाने बळजबरीने ग्राहकाकडून घेतला ८० हजारांचा ऐवज;

अजय विक्रम भालेराव (२९, शुभारंभ रेसिडेन्सी, अशोका मार्ग) यांच्या तक्रारीवरून मुंबई नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. भालेराव यांच्या तक्रारीनुसार, ते रविवारी (ता. २४) रात्री एसएसके हॉटेलमध्ये जेवायला गेले असता तेथे टेबल बुकिंगवरून हॉटेल मालक कुटे व व्यवस्थापक अविनाश यांनी १० ते १५ जण जमवून बेसबॉल स्टीकने मारहाण करीत ३० हजारांची सोन्याची साखळी, ५० हजारांचा आयफोन, असा सुमारे ८० हजारांचा ऐवज बळजबरीने काढून घेतला. तर हॉटेलचे व्यवस्थापक अविनाश देशमुख (३२, श्रमिक हौसिंग सोसायटी, माणिकनगर) यांच्या तक्रारीनुसार अजय भालेराव, एम. रामकृष्णन, शिवा अस्वले आदींनी टेबल बुकिंगच्या किरकोळ कारणावरून हॉटेल मालक शैलेश कुटे, रेस्टॉरंट मॅनेजर राम कटारे यांना लाथाबुक्यांनी मारहाण करीत, गेस्ट रिलेशन मॅनेजरला अश्लील हावभाव करीत व्यवस्थापकाच्या खिशातून १५ हजार रुपये काढून घेतल्याचे तक्रारीत म्हटले आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रवीण शिंदे तपास करीत आहेत.  

हेही वाचा > अखेर गूढ उकललेच! म्हणून केली रिक्षाचालकाने 'त्या' गर्भवती महिलेची हत्या

मालक कुटे यांच्यासह व्यवस्थापकावर गुन्हा दाखल

एसएसके हॉटेलमध्ये टेबल बुकिंगच्या कारणावरून जोरदार हाणामारी झाली. वस्तू बळजबरीने काढून घेतल्याचे परस्परविरोधी गुन्हे दाखल झाले आहेत. जेवायला आलेल्या ग्राहकाला टेबल बुकिंगच्या कारणावरून बेसबॉलच्या स्टीकने मारहाण केल्याप्रकरणी हॉटेल मालक शैलेश कुटे यांच्यासह व्यवस्थापकावर गुन्हा दाखल झाला. 

हेही वाचा > वाढदिवशीच दोघा मित्रांवर काळाची झडप; 'तो' प्रवास ठरला अखेरचाच 

टॅग्स :Nashik