esakal | एसटीला स्क्रॅप गाड्यातून २ कोटींचे उत्पन्न; महामंडळाला आर्थिक मदत
sakal

बोलून बातमी शोधा

st bus

एसटीला स्क्रॅप गाड्यातून २ कोटींचे उत्पन्न

sakal_logo
By
योगेश मोरे

म्हसरूळ (नाशिक) : एसटी महामंडळाकडून स्क्रॅप बसचा लिलाव पेठ रोडवरील विभागीय कार्यशाळा येथे गुरुवारी (ता. ८) झाला. या लिलावातून एसटी महामंडळाला २ कोटी १४ लाखांचा महसूल मिळाला. गेल्या आठवड्यापासून या लिलावाची प्रक्रिया महामंडळाकडून सुरू होती.
याआधी एसटी महामंडळाने ८ डिसेंबर २०२० रोजी लिलाव केला. यातून नाशिक विभागाने संपूर्ण राज्यात प्रथम क्रमांक पटकावीत सहा कोटीहून अधिक रक्कम मिळविली होती. (ST Corporation raised Rs 2 crore from scrap bus auction)

झालेल्या लिलावात गाड्यांचे विविध सुटे पार्ट, टायर, बॅटरी, पाटे, स्प्रिंग, रेडियटर, लोखंड, बॅरल, गियर बॉक्स, स्टार्टर या विविध पार्टचे असलेले साधारण दोनशेहून अधिक लॉट लावण्यात आले होते. दोन कोटींचे उत्पन्न मिळाल्याने आर्थिक अडणीत असलेल्या एसटी महामंडळाला आर्थिक मदत होणार आहे. लिलावात स्क्रॅप बस, सांगाडा, लोखंड , लोखंडी ब्रास , ॲल्युमिनिअम, टायर , रबर ट्रस्ट, प्लॅस्टिक बॅरल, बॅटरी, प्रेशन प्लेट यासह विविध पार्टचा लिलाव करण्यात आला. सध्या एसटी महामंडळ उत्पन्नाचे विविध स्रोत शोधत आहे. आर्थिक पाठबळ मिळवण्यासाठी आता स्वतः: एसटी महामंडळ लिलाव करण्याची प्रक्रिया राबवीत आहे.

हेही वाचा: माझी वसुंधरा अभियान : नाशिक विभागाची १४ कोटी ५० लाखांची भागीदारी


३६ व्यापाऱ्यांनी या प्रक्रियेत सहभाग घेतला. एसटी महामंडळ वर्षातून दोनवेळा लिलाव प्रक्रिया राबवीत असते. यंदाही खराब झालेल्या बस आणि विविध पार्टचा लिलाव करण्यात आला. गाड्यांचा आणि विविध पार्टचा साठा मोठ्या प्रमाणावर असल्याने अनेक व्यापाऱ्यांनी स्क्रॅप मटेरीलचा लॉट बघण्यासाठी विभागीय कार्यशाळेत भेट दिल्या. लिलावप्रसंगी विभाग नियंत्रक राजेंद्रकुमार पाटील, उपयंत्र अभियंता मुकुंद कुंवर, उपयंत्र अभियंता प्रशांत पद्मने, दक्षता अधिकारी भारती, विभागीय भांडारपाल उपेंद्र मोरे, चार्जमन विश्वनाथ भांबर आदी उपस्थित होते.
(ST Corporation raised Rs 2 crore from scrap bus auction)

हेही वाचा: नाशिकमध्ये विवाहात मास्क, सॅनिटायझरसोबत थर्मामीटर सक्तीचे

loading image