Chhagan Bhujbal : एसटी कर्मचाऱ्यांसाठी भुजबळ मैदानात; "आईही दूध पाजत नाही रडल्याशिवाय, आता लढणार!"
ST Workers’ Rights : Bhujbal Vows Legal and Political Support : जुने नाशिक येथे पार पडलेल्या सेवाशक्ती संघर्ष संघटनेच्या मेळाव्यात एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतन आणि अन्य मागण्यांसाठी मंत्री छगन भुजबळ, आमदार गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत आदींनी सरकारकडे पाठपुराव्याची ग्वाही दिली.
Chhagan Bhujbal Warns Protest for ST Workersesakal
जुने नाशिक: राज्य परिवहन महामंडळातील (एसटी) कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या, अपेक्षा आहेत. त्यासाठी लढले पाहिजे. रडल्याशिवाय तर आईदेखील दूध पाजत नाही. त्यामुळे लढणे आवश्यक आहे. आता वकीलपत्र घेतले आहे, असे जाहीर करतो.