esakal | ...त्यामुळे मी राज ठाकरेंची पन्नास भाषणं ऐकणार; प्रत्यक्ष भेट व चर्चेनंतर चंद्रकांतदादांना साक्षात्कार!
sakal

बोलून बातमी शोधा

..त्यामुळे राज ठाकरेची पन्नास भाषणं ऐकणार! - चंद्रकांत पाटील

..त्यामुळे राज ठाकरेची पन्नास भाषणं ऐकणार! - चंद्रकांत पाटील

sakal_logo
By
विनोद बेदरकर

नाशिक : राज ठाकरे (raj thackeray) हे महाराष्ट्रातील आश्‍वासक नेते आहेत. विद्यार्थिदशेपासून त्यांच्याशी परिचय आहे. त्यांच्याशी आज झालेल्या भेटीत काही फक्त हवा-पाण्याची चर्चा झाली नाही, तर राजकीय चर्चा झाली. त्यांच्या परप्रांतीयांच्या भूमिकेचा चुकीचा अर्थ घेतला जातो, असे राज यांचे म्हणणे आहे. त्यामुळे मी स्वतः त्यांची चाळीस ते पन्नास भाषणं ऐकणार आहे, असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील (chandrakant patil) यांनी येथे केले. (Statement-of-Chandrakant-Patil-after-meeting-with-raj-thackeray-jpd93)

प्रत्यक्ष भेट व चर्चेनंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादांना साक्षात्कार

पाटील आणि ठाकरे नाशिकच्या दौऱ्यावर आहेत. रविवारी (ता. १८) दोन्ही नेत्यांची भेट झाली. त्यामुळे या भेटीत झालेल्या चर्चेविषयी विचारले असता, प्रदेशाध्यक्ष पाटील म्हणाले, की राज ठाकरे भारतीय विद्यार्थी सेनेचे, तर मी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कामकाज करीत असल्यापासून, म्हणजे जवळपास ४० वर्षांपासून आम्ही परस्परांना ओळखतो. त्यांची वोट बँक मोठी आहे. चेहरा आश्‍वासक आहे. पण, त्यांनी परप्रांतीयांविषयीची भूमिका बदलली पाहिजे, असे भाजपचे मत आहे. तर दुसरीकडे आपल्या परप्रांतीयांबाबतच्या भूमिकेविषयी चुकीच्या पद्धतीने मांडणी होते, असे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे आपण त्यांची भाषणं ऐकणार असल्याचेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले.

राज्याने इंधनदर दहा रुपयांनी कमी करावे

राज्याने दहा रुपयानी इंधनाचे दर कमी करावेत, अशी मागणी पाटील यांनी केली. ते म्हणाले, की इंधनाचे दर केंद्र शासन ठरवित नाही. आंतरराष्ट्रीय स्तरावरून ते ठरतात. कच्च्या तेलाच्या आयतीनंतर केंद्राला प्रोसेसिंगचा खर्च येतो. राज्याला असा कुठलाही खर्च येत नाही. त्यामुळे केंद्राने नव्हे, तर राज्याने इंधनाचे दर दहा रुपयांनी कमी करावेत. याबाबत आम्ही केंद्र शासनाशी बोलू, असेही ते म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी व ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या भेटीपूर्वी श्री. मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचीही भेट झाली. वेगवेगळ्या पक्षांच्या नेत्यांशी भेटीगाठीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात गोंधळाची स्थिती नाही का? याविषयी ते म्हणाले, की, माझ्याही मनात हा गोंधळ आहे. पण, माझे गुरू यशवंतराव खेडकर यांनी, ‘तुझी खोली तू स्वच्छ ठेव, इतरांच्या खोलीत डोकावू नको,’ असे सांगितले. महाराष्ट्राच्या या स्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी केंद्रातील नेते नरेंद्र मोदी व अमित शहा सक्षम आहेत. त्यामुळे मी यात लक्ष घालत नसल्याचेही त्यांनी या वेळी नमूद केले.

हेही वाचा: राज्याचे लक्ष लागलेला 'तो' विवाह सोहळा अखेर रद्द!

हेही वाचा: विकेंडला नाशिककरांची त्र्यंबकेश्वर, अंबोली घाटात मांदियाळी

loading image