Nashik 11th Admission: अद्यापही 11 हजार जागा रिक्‍त! विशेष फेरीची मुदत संपली

अकरावीचे सोळा हजार प्रवेश निश्‍चित
Admission
Admissionesakal

Nashik 11th Admission : इयत्ता अकरावीच्‍या प्रवेश प्रक्रियेअंतर्गत एकूण चार फेऱ्यातून १६ हजार १३८ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत.

यानंतरही ११ हजार १०२ जागा रिक्‍त असून, त्‍यासाठी पुढील प्रक्रियेत प्रवेश दिले जाणार आहे. सायंकाळी उशिरापर्यंत शिक्षण विभागातर्फे प्रवेश वेळापत्रक जाहीर करण्यात आले नव्‍हते. (Still 11 thousand seats vacant special round expired nashik)

नाशिक महापालिका क्षेत्रातील ६६ कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये उपलब्‍ध असलेल्‍या एकूण २७ हजार २४० जागांसाठी ऑनलाइन केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. याअंतर्गत प्रवेश फेरी व कोट्याच्‍या जागांवर प्रवेश देण्याची प्रक्रिया सुरू आहे.

तीन नियमित फेऱ्या आणि एक विशेष फेरी अशा एकूण चार फेऱ्या पार पडल्‍यानंतर या फेऱ्यातून १४ हजार ६६८ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्‍चित केले आहेत. तर कोट्याच्‍या जागांवर एक हजार ३७० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले.

असे एकूण १६ हजार १३८ विद्यार्थ्यांनी अकरावीला प्रवेश घेतले आहेत. यानंतरही कॅप राउंडमधील ९ हजार २७९ आणि कोट्याच्‍या एक हजार ८२३ अशा एकूण ११ हजार १०२ जागा रिक्‍त आहेत.

या जागांवर प्रवेशासाठी शिक्षण विभागातर्फे पुढील काय प्रक्रिया राबविली जाते, याकडे लक्ष असणार आहे. सायंकाळी उशिरापर्यंत यासंदर्भात सूचना जाहीर करण्यात आली नव्‍हती.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Admission
Success Story: रोबोटीक्स वर्ल्ड चॅम्पियनमध्ये चमकले चिमुकले!

विद्यार्थ्यांचा प्रतिसाद

पहिल्‍या विशेष फेरीला विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या फेरीसाठी १३ हजार जागा रिक्‍त असताना, ४ हजार ४८७ विद्यार्थी अर्ज भरून सहभागी झाले होते. त्‍यापैकी ४ हजार २९३ विद्यार्थ्यांची निवड गुणवत्ता यादीत करण्यात आली होती.

सतत सुरू असलेल्‍या पावसामुळे विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी सोमवार (ता. ३१) पर्यंत वाढीव मुदत दिलेली होती. यातून ३ हजार ७९२ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्‍चित केले आहे.

Admission
Nashik Crop Insurance: जिल्ह्यातील साडेतीन लाख शेतकऱ्यांचा ‘पीकविमा’! 3 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com