Nashik Rain News : जिल्ह्यातील 10 धरणे ‘ओव्हरफ्लो’; 24 धरणांमध्ये 84 टक्के साठा

Darna Dam
Darna Damesakal

Nashik Rain News : जिल्ह्यात पावसाने अखेरच्या टप्प्यात जोरदार हजेरी लावल्याने २४ धरणांमधील साठा ८४ टक्क्यांवर पोहोचला आहे.

जिल्ह्यात सध्या १० धरणांचा साठा १०० टक्के झाला असून, १० धरणांमध्ये ९० टक्क्यांवर साठा आहे. ( stock of 10 dams in district has reached 100 percent nashik news)

माणिकपुंजची स्थिती काहीशी तशीच आहे. नाशिक, नांदगाव, मनमाडसह अनेक भागांत पाऊस झाला. जवळपास १४ धरणांमधून कमी-अधिक प्रमाणात विसर्ग सुरू आहे. तीन-चार दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने जोर धरला.

त्यामुळे नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूरसह कश्यपी, गौतमी गोदावरी आणि आळंदी ही धरणे जवळपास तुडुंब झाली आहेत. या व्यतिरिक्त पालखेड, करंजवण, वाघाड, ओझरखेड, पुणेगाव, दारणा, भावली, वालदेवी, कडवा, नांदूरमध्यमेश्वर, चणकापूर, हरणबारी, केळझर, पुनद ही धरणे पूर्ण भरली आहेत.

Darna Dam
Maharashtra Ashram School : मॉडेल स्कूलधर्तीवर आश्रमशाळांही होणार आदर्श; पहिल्या टप्प्यात 250 आश्रमशाळांचा समावेश

मनमाड शहराला आवर्तनाद्वारे पाणीपुरवठा करणारे पालखेड धरण पूर्णपणे भरल्याने मनमाडकरांना दिलासा मिळाला. दिंडोरी तालुक्यातील पावसामुळे करंजवण धरण संपूर्ण क्षमतेने भरले असून, पालखेड धरण जवळपास ९७ टक्के भरले आहे.

शहरात दणक्यात हजेरी

गणरायाच्या विसर्जनाच्या पूर्वसंध्येला शहरात पावसाने जोरदार हजेरी लावली. दुपारी एक ते सायंकाळी साडेपाचपर्यंत शहरात २० मिलिमीटर पाऊस झाला. साडेपाचनंतरही पाऊस जोरदारपणे पडत होता. त्यामुळे शहरवासीयांची चांगलीच दाणादाण उडाली.

Darna Dam
Nashik Brahmagiri News : ब्रह्मगिरी उत्खननाची हरित लवादाकडून चौकशी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com