esakal | मुलीचा विवाह सुरू असतानाच वधूपित्याला लुटले! विवाहाच्या आनंदात विरजण
sakal

बोलून बातमी शोधा

gold-.jpg

मुंबई-आग्रा महामार्गावरील ज्यूपिटर हॉटेलमध्ये विवाहाचा सोहळा सोहळा सुरू होता. सर्वजण आनंदात होते. पण अचानक या आनंदात विरजण पडले. कारण विवाह सुरू असतानाच वधूपित्याला लुटले. काय घडले नेमके?

मुलीचा विवाह सुरू असतानाच वधूपित्याला लुटले! विवाहाच्या आनंदात विरजण

sakal_logo
By
विनोद बेदरकर

नाशिक :  मुंबई-आग्रा महामार्गावरील ज्यूपिटर हॉटेलमध्ये विवाहाचा सोहळा सोहळा सुरू होता. सर्वजण आनंदात होते. पण अचानक या आनंदात विरजण पडले. कारण विवाह सुरू असतानाच वधूपित्याला लुटले. काय घडले नेमके?
 

विवाहाच्या आनंदात विरजण

सुरेश बजाज यांच्या तक्रारीनुसार, त्यांच्या मुलीचा विवाह सुरू असताना मंगळवारी रात्री पावणेदहाच्या सुमारास चोरट्याने दोन लाख दहा हजारांचा सोन्याचा हार, ७० ग्रॅमचे कानातील झुमके, सहा ग्रॅमचे झुमके, पाच लाखांचा हिऱ्याचा हार, दीड लाखांची पाच सोन्याची नाणी, ११० ग्रॅमचे ११ चांदीचे शिक्के, ३५ ग्रॅमचा सोन्याचा हार, एक लाख रुपयांची रोकड, असा सुमारे दहा लाख ८३ हजारांचा ऐवज असलेली बॅगच चोरट्याने लंपास केली. 

हेही वाचा>> जेव्हा अजगर गिळायला लागतो संपूर्ण बोकडाला! तब्बल पाच-सहा तास प्रयत्न; पाहा VIDEO

पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

मुंबई-आग्रा महामार्गावरील ज्यूपिटर हॉटेलमध्ये सुरू असलेल्या विवाहात चोरट्याने सोन्या चांदीचा ऐवज असलेला सुमारे १० लाख ८२ हजारांचा ऐवज असलेली वधूपित्याची बॅग लांबविली. या प्रकरणी सुरेश मदनलाल बजाज (वय ५५, मिरची गल्ली, बालाजी मंदिर, शहापूर, जि. ठाणे) यांच्या तक्रारीवरून इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

 हेही वाचा>> शिवला डॉक्टर नाही तर इंजिनिअर करीनच!" फुटपाथावर जगत असलेल्या जिद्दी दाम्पत्याचं स्वप्न

दुसरी घटना -रिक्षा आडवी लावून युवकांना लुटले 
नाशिक : जत्रा नांदूर लिंक मार्गावर रिक्षातून आलेल्या चौघांनी दुचाकीवरून चाललेल्या दोघांच्या गाडीला रस्त्यात रिक्षा (६४५४) आडवी लावून मारहाण करीत, त्यांच्याकडील पाच हजार ७०० रुपये, १६ हजारांचे दोन मोबाईल, अडीच तोळ्यांचा चांदीचा गोफ, बँकेचे एटीएम, आधारकार्ड, पॅनकार्ड असा सुमारे २३ हजार २०० रुपयांचा ऐवज बळजबरीने लुटला. या प्रकरणी रोशन रमेश निमसे (वय १९, निमसे मळा, नांदूर) याच्या तक्रारीवरून आडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 

loading image
go to top