सटाण्यात भटकी कुत्री, डुकरांची दहशत

stray dogs & Pigs
stray dogs & Pigsesakal

सटाणा (जि. नाशिक) : शहरात सध्या मोकाट कुत्र्यांनी (Stray Dogs) धुमाकूळ घातला असून, रस्त्यावरून जाणाऱ्या पादचारी व वाहनचालकांचा पाठलाग करून त्यांच्यावर मोकाट कुत्र्यांकडून हल्ला होण्याचे प्रकार वाढले आहेत. या मोकाट कुत्र्यांबरोबरच डुकरांचाही (Pigs) मुक्तसंचार वाढल्याने शहरात सर्वत्र अस्वच्छतेचे साम्राज्य निर्माण झाले आहे. नववसाहतींमध्ये कुत्र्यांचे टोळके दररोज डुकरांवर हल्ला करून त्यांचा फडशा पाडत असल्याने दुर्गंधी आणि रोगराईचे वातावरण पसरले आहे. वारंवार तक्रारी करूनही कोणतीही प्रतिबंधात्मक उपाययोजना होत नसल्याने शहरवासीयांमध्ये पालिका प्रशासनाविरोधात नाराजीचा सूर आहे. (Stray dogs panic of pigs in satana Nashik News)

शहरात दिवसेंदिवस मोकाट कुत्रे, डुकरे व जनावरांची संख्या वाढत आहे. सर्वच प्रभागात या मोकाट प्राण्यांचा उपद्रव सुरु आहे. रस्त्यावरून मार्गक्रमण करताना दबा धरून बसलेले कुत्रे वाहनचालकावर कधी हल्ला करतील याचा नेम नाही. अनेक नागरिक व वाहनचालकांना याचा दररोज अनुभव येत आहे. वाहनचालकाने या अचानक झालेल्या हल्ल्यापासून बचाव करण्यासाठी वाहनाचा वेग वाढविला तर त्यापेक्षा दुप्पट वेगाने कुत्रे पळत सुटतात. त्यातच दुचाकी चालकाचा वाहनावरील ताबा सुटून वाहन घसरते व अपघात होतो. या अपघातात रस्त्याने चालणाऱ्या निरपराध आबालवृद्धांवर जखमी होण्याची वेळ येते. कुत्र्यांच्या टोळक्यामुळे पहाटे मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडणाऱ्या लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

ओला व सुका कचरा संकलित करण्यासाठी पालिकेने घंटागाडी सुरु केली आहे. मात्र, काही नागरिक शिळे अन्न, उरलेली मटण, चिकनची हाडे घंटागाडीत न टाकता दररोज घरांसमोर मोकळ्या जागेत टाकत असतात. त्यावर डुकरे, मोकाट कुत्री तुटून पडतात. त्यांना हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला तर कुत्री हल्ला करतात. दिवसेंदिवस वाढणाऱ्या कुत्र्यांच्या संख्येमुळे नागरिकांना रस्त्याने जाताना भीती वाटू लागली आहे. या मोकाट कुत्र्यांमुळे रस्त्यांवरील अपघातांचे प्रमाणही वाढले आहे.

stray dogs & Pigs
Nashik : बसफेऱ्या वाढविण्याची गरज; प्रवाशांची नांदगाव आगाराकडे मागणी

रस्त्यावर कसेही आणि कुठेही वेगाने पळणाऱ्या कुत्र्यांमुळे दुचाकीस्वार पडून ते गंभीर जखमी झाल्याच्या अनेक घटना नववसाहतीत घडल्या आहेत. कुत्र्यांचे टोळके दिवसाढवळ्या आणि रात्री- अपरात्री घरे व दुकानांबाहेर असलेल्या चपला व बुट पळवून नेतात. कचरा आणि अस्वच्छतेमुळे भटक्या कुत्र्यांची संख्या वाढत आहे. नववसाहती व जुन्या शहरातील गल्लीबोळात मोकाट डुकरे व कुत्रे नागरिकांच्या घरासमोर किंवा बाजूला तुंबलेल्या गटारींमध्ये लोळत असल्याने रोगराई पसरली आहे. एकूणच या मोकाट प्राण्यांमुळे शहरवासीयांच्या आरोग्याचा व सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाल्याचे चित्र आहे.

stray dogs & Pigs
Nashik : सासऱ्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपातून सुनेची मुक्तता

"नववसाहतीत सध्या भटक्या कुत्र्यांची मोठी दहशत आहे. त्यामुळे लहान मुलांना घराबाहेर खेळणे धोक्याचे झाले आहे. पालिकेने अशा कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, यासाठी तक्रारी करूनही त्यावर उपाययोजना झालेल्या नाहीत."

- सुयोग अहिरे, नागरिक, सटाणा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com