देवळ्यात २७ गावांमधील पथदीप बंद | Nashik News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

road light

देवळ्यात २७ गावांमधील पथदीप बंद

देवळा (जि. नाशिक) : तालुक्यातील जवळपास २७ गावांमधील पथदीप गेल्या चार- पाच दिवसांपासून बंद असल्याने ऐन पावसाळ्यात या गावांमध्ये अंधाराचे साम्राज्य आहे. थकीत वीजबिलांमुळे हा प्रश्‍न निर्माण झाला आहे. याबाबत पर्याय शोधत पथदीप चालू व्हावेत, अशी मागणी या गावांकडून होत आहे.

हेही वाचा: महावितरणविरोधात शेतकऱ्यांचा संताप; सुरळीत वीजपुरवठा करण्याची मागणी

सध्या पावसाला सुरवात झाल्याने रात्रीच्या वेळी उजेड असणे गरजेचे असताना वीजबिल प्रश्‍नावरून या गावांमध्ये अंधार आहे. देवळा विभागातील लोहोणेर, ठेंगोडा, वाखारवाडी, बगडू आणि देवळा नगरपंचायत याच गावातील पथदीप सध्या सुरू असून, इतर २७ गावांना पथदिपांची समस्या निर्माण झाली आहे. यामुळे रात्रीच्या वेळी अनेक समस्यांना तोंड देण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. लहान मुले, महिला व ज्येष्ठ नागरिकांना घराबाहेर पडणे यामुळे अवघड झाले असून, अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. शिवाय सर्प, विंचू यापासून बचाव करण्याचे मोठे आव्हान आहे. थकीत बिलांचा प्रश्‍न सोडविण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

"ग्रामपंचायतींनी तातडीने पथदीपांचा बिल भरणा केल्यास तेथील विद्युत पुरवठा सुरू करत नागरिकांची गैरसोय टाळता येईल."

- बी. एस. सुरवसे, उपकार्यकारी अभियंता, देवळा उपविभाग

"पूर्वी राज्य शासनाकडून जिल्हा परिषदेमार्फत मिळालेल्या निधीतून पथदीपांचा वीजबिल भरणा होत असे. आता पंधराव्या वित्त आयोगातून बिल भरता येत नाही. त्यामुळे जिल्हा परिषदेने बिल भरणा करावा."

- आदिनाथ ठाकूर, सरपंच, दहिवड (ता. देवळा)

हेही वाचा: महावितरणचा मनमानी कारभार; माळमाथा परिसरातील शेतकरी हैराण

Web Title: Street Lights Supply Cut Off 27 Villages In Devala Taluka Due To Not Paid Electricity Bills In Nashik

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top