esakal | शहर-जिल्ह्यात आजपासून कडक लॉकडाउन; आंतरजिल्हा प्रवासावर रात्रीपासून निर्बंध

बोलून बातमी शोधा

lockdown
शहर-जिल्ह्यात आजपासून कडक लॉकडाउन; आंतरजिल्हा प्रवासावर रात्रीपासून निर्बंध
sakal_logo
By
विनोद बेदरकर

नाशिक : गुरुवारी (ता. २२) रात्री आठपासून राज्यात लॉकडाउन सुरू झाला आहे. येत्या १ मेपर्यंत लॉकडाउन असणार आहे. लॉकडाउनध्ये आंतरजिल्हा प्रवासावर निर्बंध आणले गेले आहेत. गंभीर कारणासाठी जिल्हाबाहेर जाता येणार आहे. त्यामुळे सायंकाळपासून शहर व जिल्ह्याच्या सीमा भागावर कडक बंदोबस्त लावण्यात आला आहे.

आंतरजिल्हा प्रवासावर रात्रीपासून निर्बंध

राज्यात ‘बेक्र द चेन’ मोहिमेंतर्गत निर्बंध अधिक कडक लॉकडाउन सुरु करण्यात आला आहे. गुरुवार (ता.२२) रात्री आठपासून सुरु झालेल्या लॉकडाउनमध्ये येत्या १ मेपर्यत हा लॉकडाउन असणार आहे. नव्या निर्बधात विवाहाला परवानगी देण्यात आली आहे. मात्र अवघ्या दोन तासात आणि तेही २५ नागरिकांच्या उपस्थितीत विवाह करता येणार आहे. जिवणावश्यक सात सेवेच्या दुकानासाठी सकाळी सात ते अकरापर्यत दुकान सुर ठेवता येणार आहे. जिवणावश्यक वस्तूंच्या दुकानात दूधासह अगदी मोजक्या दुकानांना परवानगी असणार आहे.

हेही वाचा: कोविड सेंटरच्या पायरीवर सोडला रुग्णाने प्राण! चांदवडच्या व्हायरल VIDEO मागचं सत्य..

१५ टक्के उपस्थिती

शासकीय प्रशासकीय कार्यालयात अवघ्या १५ टक्के उपस्थितीला परवानगीला दिली आहे. कार्यालयात १५ टक्के कर्मचारी ठेउन कामकाज सुरु ठेवण्याला परवानगी दिली आहे. कमीत कमी लोकांच्या उपस्थितीत वर्क फ्रॉम होम संकल्पनेवर आधारीत कामकाज सुरु ठेवण्यास परवानगी आहे. राज्यभर परिवहन महामंडळासह सार्वजनिक वाहातूक सेवेला परवानगी असती तरी अत्यावश्यक सेवेतील लोकांसाठी या सेवा असणार आहे. त्यामुळे त्यामुळे अत्यावश्यक सेवेसाठी प्रवास सुरु आहे का यावरही पोलिसांचे लक्ष असणार आहे. वैद्यकिय प्रतिनिधी, मेडीकल दुकानदार यासह इतर अत्यावश्यक सेवेसाठी वापर होणार आहे.

हेही वाचा: नाशिक ऑक्सिजन गळती : संशय बळावला! ऑक्सिजन ठेकेदार कंपनीचा लागेना थांगपत्ता

नाकाबंदी बंदोबस्त

दरम्यान सुरु झालेल्या लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर शहर जिल्ह्यातील रस्त्यावर प्रमुख मार्गावर नाकाबंदी करण्‍यात आली आहे. सायंकाळपासून ठिकठिकाणी बंदोबस्त लावण्यात आला.