
नाशिक : प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तीमुळे होणारी पर्यावरणाची हानी, मोठ्या प्रमाणावरील जलप्रदूषण थांबावे, शाडू मातीपासून गणेशमूर्ती तयार करण्याच्या कलेला व्यापक स्वरूप प्राप्त व्हावे यासाठी कलानिकेतनचे पाच विद्यार्थी एकत्र आले.
त्यांनी शाडू मातीपासून बनविलेल्या पर्यावरणस्नेही गणेशमूर्तीद्वारे समाजापुढे एक आदर्शही उभा केला आहे. (student of chitrakala mahavidyalaya started business of eco friendly ganesh idol making nashik Latest Marathi News)
तीळभांडेश्वर लेनमध्ये चित्रकलेचे शिक्षण देणारे कलानिकेतन महाविद्यालय आहे. या ठिकाणी ललित कलेचे शिक्षण घेणारे अविनाश पगारे, कलश भावसार, कनक भावसार, समृद्धी जाधव, वैभव कुंभार व अनुजा कोठावदे या विद्यार्थ्यांनी आपल्या कलेला व्यावसायिक रूप मिळावे.
पीओपीच्या मूर्तीपासून होणारे जलप्रदूषण थांबावे यासाठी शाडू मातीपासून गणेशमूर्ती बनविण्याचा ध्यास घेतला. विशेष म्हणजे हे विद्यार्थी केवळ ध्यास घेऊन थांबले नाहीत, तर अवघ्या महिनाभरात पाचशेपेक्षा अधिक सुंदर मूर्तींना अंतिम रूपही दिले आहे.
१७ ते २३ वयोगटातील या यंगर्स टीमने मार्केटिंगचे तंत्रही आत्मसात केले असून, बुकिंगही मिळू लागल्याचे अविनाश पगारे याने सांगितले. सुरवातीला घरातील ज्येष्ठांकडून काही भांडवल जमा करत जुन्या आडगाव नाक्यालगत छोटेखानी कारखाना सुरू केल्याचे त्याने सांगितले.
या कारखान्यास भेट दिली असता, या मित्रांचे समाजाभिमुख, आगळेवेगळे कर्तृत्व समोर आले. महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच आपण शिकत असलेल्या कलेला व्यावसायिक रूप यावे, जेणेकरून पर्यावरणाचेही रक्षण व्हावे, व्यावसायिक मूल्यांबरोबरच मार्केटिंगचे धडे मिळावेत, यासाठी ही टिम प्रयत्नशील आहे.
समाजानेही या विद्यार्थ्यांच्या कलेकडे सकारात्मक विचाराने पहावे, अशी अपेक्षा या विद्यार्थ्यांनी व्यक्त केली आहे. डोंगरे वसतिगृहाच्या मैदानावर स्टॉल लावण्यात येणार असून नाशिककरांनी शाडू मातीच्या मूर्तीच्या खरेदीतून या धडपड्या युवकांच्या पाठीमागे बळ उभे करावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
अर्धा फूट ते चार फूट
चार रूमच्या छोटेखानी फ्लॅटमध्ये सुरू झालेल्या या कारखान्यासाठी खास नंदूरबार येथून मातीचे साचे आणले. त्यानंतर शहर परिसरातून शाडू माती खरेदी करून गणेश मूर्तींना अंतिम रूप दिले जात आहे.
या ठिकाणी सहा इंचापासून ते चार फुटांपर्यंत गणेशमूर्ती तयार केल्या जात आहेत. सध्या पाचशेहून अधिक गणेशमूर्ती विक्रीसाठी तयार असल्याची माहिती कनक भावसार, समृद्धी जाधव, वैभव कुंभार, अनुजा कोठावदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.