Personality Development : विद्यार्थ्यांनो सुट्यांमध्ये व्यक्‍तिमत्त्‍व विकासात भर घाला! करा ही कामे

Personality Development
Personality Developmentesakal

नाशिक : उन्‍हाळी सुट्या म्‍हटल्‍या की धम्‍माल मस्‍ती, मौजमजा करण्याची मुला-मुलींची इच्‍छा असते. नुकताच दहावी, बारावीच्‍या परीक्षा संपल्‍या असून, या विद्यार्थ्यांना सुट्या लागल्‍या आहेत.

सुट्यांच्‍या कालावधीत या विद्यार्थ्यांना व्यक्‍तिमत्त्‍व विकासाची संधी उपलब्‍ध आहे. त्‍यामुळे आत्‍मविकासावर भर देताना, छंदांतून आपल्‍यातील कल्‍पकतेला वाव देण्याचा सल्‍ला जाणकारांकडून दिला जातो आहे.

करिअरच्‍या दृष्टीने दहावी, बारावीच्‍या परीक्षा महत्त्वाच्या मानल्‍या जातात. म्‍हणूनच या इयत्तांमध्ये शिक्षण घेत असलेले विद्यार्थी गेल्‍या काही महिन्‍यांपासून अभ्यासात दंग झाल्‍याचे बघायला मिळत होते. आता परीक्षा संपल्‍या असल्‍याने विद्यार्थ्यांनी सुटकेचा नि:श्‍वास सोडला आहे. (Students add personality development during vacations after ssc hsc nashik news)

सुट्यांचा मनसोक्‍त आनंद लुटण्याचे नियोजनही अनेकांनी आखले आहे. मौजमजा करतानाच व्यक्‍तिमत्त्‍व विकास साधण्याची चांगली संधी असून, यादृष्टीने विचार करण्याचा सल्‍ला जाणकारांकडून दिला जातो आहे. स्‍वतःच्‍या विकासासाठी गुंतविलेला वेळ भविष्यात नक्‍कीच फायदेशीर ठरु शकतो, असा विश्‍वास व्‍यक्‍त केला जातो आहे.

विद्यार्थ्यांनो सुट्यांमध्ये हे करा...

* सुट्यांच्‍या कालावधीचे योग्‍य नियोजन करा.

* संगणक कौशल्‍य, अन्‍य कौशल्‍ये आत्‍मसात करा.

* आपल्‍या आवडीचा छंद जोपासण्याचा प्रयत्‍न करा.

* मैदानी खेळासाठी वेळ द्या, शक्‍यतो उन्‍हाची वेळ टाळा.

* मित्र, कुटुंबीयांसोबत विविध विषयांवर संवाद साधा.

* निसर्गाशी नाते जोडा, निसर्गाच्‍या सानिध्यात वेळ घालवा.

* आपल्‍या आवडीच्‍या विषयांचे पुस्‍तके वाचा.

Personality Development
Health Tips: फ्रिजमध्ये चुकूनही ‘ही’ फळे ठेवू नका

विद्यार्थ्यांनो हे लक्षात ठेवा..

* मोबाईल, टीव्‍ही, कॉम्‍प्‍युटरचा अतिवापर करू नका.

* घरात बसून राहू नका, मित्रांमध्ये मिसळा.

* उन्‍हामध्ये फिरण्याचे टाळा, योग्‍य खबरदारी घ्या.

* रात्री उशिरापर्यंत जागरण करू नका.

* फास्‍ट फूड, जंकफूडचे अतिसेवन टाळा.

पालकांनो तुम्‍ही हे करा..

* सुट्यांमध्ये आपल्‍या पाल्‍यासोबत स्‍नेहभोजन घ्या.

* जेवण करताना टीव्‍ही, मोबाईलचा वापर टाळा.

* मुलांसोबत संवाद साधत त्‍यांच्‍या आवडी-निवडी जाणून घ्या.

* छंद जोपासण्यासाठी त्‍यांना प्रोत्‍साहित करा.

* शारीरिक, मानसिक आरोग्‍य चांगले राखण्यासाठी प्रयत्‍न करा.

* शारीरीक व बौद्धिक विकासासाठी पोषक वातावरण निर्माण करा.

हेही वाचा : नोकरदार असाल तर रोखीनंच घ्या कार

Personality Development
Health Tips : खरंच चहा-कॉफी पिल्याने वजन कमी होतं?

संस्‍कृतमधील श्र्लोकात वेळेचे महत्त्‍व विशद केलेले आहे.

अलसस्य कुतो विद्या, अविद्यस्य कुतो धनम् ।

अधनस्य कुतो मित्रम्, अमित्रस्य कुतः सुखम् ॥

श्र्लोकात नमूद केल्‍यानुसार आळशी माणसाला विद्या कशी मिळणार..विद्या नसलेल्‍या माणसाला संपत्ती कशी मिळणार.. ज्याच्याकडे संपत्ती नाही, त्‍यास मित्र कुठून आणि मित्र नसलेल्याला सुख कसे मिळणार.. अर्थात आळशी माणसाला सुखाची अनुभूती होऊ शकत नाही.

"सुट्यांमध्ये गॅझेटच्‍या अतिवापरामुळे त्‍यांचे व्‍यसन जडण्याची शक्‍यता आहे. त्‍यामुळे गॅझेटचा मर्यादित वापर ठेवावा. कौशल्‍ये आत्‍मसात करण्यासाठी अधिकाधिक वेळ द्यावा. आपल्‍यातील कल्‍पकता वृद्धींगत करण्यासाठी छंद जोपासावे. मैदानी खेळ, व्‍यायामाला प्राधान्‍य द्यावे. निसर्गाशी जवळीक साधताना सामाजिक दृष्टिकोन विकसित करण्याचा प्रयत्‍न करावा."

- डॉ. प्रिया राजहंस, मानसोपचार तज्‍ज्ञ.

Personality Development
Yoga For Men's Health : विवाहित पुरुषांनी ही योगासने करावी, आरोग्यदायी फायदे वाचून व्हाल चकीत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com