ऑनलाइन शिक्षणाला कंटाळलो बुवा! शाळा सुरू होण्याची उत्सुकता

online education.jpg
online education.jpg

खेडभैरव (जि.नाशिक) : गेल्या आठ ते नऊ महिन्यांपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद असल्याने शिक्षण विभागाने ऑनलाईन शिक्षणाचा धडाका लावला असला तरी मात्र आता विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणाचा कंटाळा आला असल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. पुढील वर्षातील 4 जानेवारीपासून जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील इयत्ता 9 वी ते 12 वी चे वर्ग सुरू करण्याची तयारी जिल्हा प्रशासनाने दाखवली असल्याने विद्यार्थ्यांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे.

ऑनलाइन शिक्षणाला कंटाळलो बुवा! शाळा सुरू होण्याची उत्सुकता

आजही जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील काही गावांमध्ये वाड्या-वस्त्यांवर मोबाईल किंवा पुरेशा नेटवर्कच्या अभावामुळे विद्यार्थी ऑनलाइन शिक्षणापासून वंचित राहत आहेत.9 वी ते 12 वी चे वर्ग हे शिक्षणाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे मानले जाते. तर काही विद्यार्थी काही दिवसांपासून सुरू असलेल्या ऑनलाइन शिक्षणाला कंटाळले असल्याचे सांगत आहेत.विद्यार्थ्यांचा व शिक्षकांचा वर्गाप्रमाणे संवाद होत नाही किंवा शिक्षकांनी विचारलेल्या प्रश्नांना विद्यार्थ्यांना व्यवस्थित रित्या उत्तर देता येत नाही.

प्रशासनाने दर्शविलेल्या तयारीमुळे उत्साहाचे वातावरण
शाळा बंद असल्याने विद्यार्थी शाळेच्या मैदानावरील खेळांपासून गेल्या वर्षभरापासून दूर आहेत.याचा प्रतिकूल परिणाम त्यांच्या शारीरिक व मानसिकतेवर होत असून फक्त ऑनलाइन शिक्षणामुळे मुलांमध्ये चिडचिडेपणा, एकटे राहण्याची सवय असे अनेक प्रतिकूल परिणाम होत असल्याचे पालक व तज्ज्ञांचे मत आहे. यामुळे शाळा सुरू होऊन पूर्वीप्रमाणेच वर्गातील शिक्षण मिळणार या आशेवर इयत्ता 9 वी ते 12 वीत शिकणारे विद्यार्थी असून त्यांच्यात ग्रामीण भागातील शाळा उघडण्याच्या जिल्हा प्रशासनाने दर्शविलेल्या तयारीमुळे उत्साहाचे वातावरण आहे.

माझ्या कुटुंबात दोन शालेय विद्यार्थी शिक्षण घेत आहेत परिस्थिती अभावी घरात प्रत्येकाला स्वतंत्र मोबाईल नसल्याने ऑनलाईन शिक्षण घेण्यात मुलांना अडचण येत आहे.- भोरु मधे, पालक. खेडभैरव, ता. इगतपुरी

ऑनलाईन शिक्षण चालू आहे मात्र कधी कधी मोबाईलची रेंज गेल्यास ऑनलाईन शिक्षणात अडचण येते काही गोष्टी शिक्षकांनी सांगितलेल्या समजत नाहीत.- कविता मडके .विद्यार्थीनी.पिंपळगाव मोर (ता.इगतपुरी)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com