Nashik Leopard News: नायगाव खोरे भागात नाशिक पश्चिम वनविभागाला पुन्हा यश; दुसरा बिबट्या अडकला

Leopard
Leopardesakal

वडांगळी : नायगाव (ता.सिन्नर )येथील शिवारातील सायखेडा रस्ता लगत पांदीचा ओहोळ ठिकाणी शेतकरी त्र्यंबक भांगरे यांच्या शेतात पुन्हा दुसरा बिबट्या पिंजऱ्यात अडकला आहे.

वनविभागाच्या बिबट्या शोधा अन् पकडा मोहीमेत सलग दुसरा दिवशी रात्रीचा पिंजरा उभारला अन् बिबट्या सापळ्यात अडकला आहे. पहिला जो बिबट्या पडकला त्याला पिंजऱ्यातून मुक्त करण्यासाठी साठी दुसरा बिबट्या भाऊ नर बिबट्या आला. (Success again for Nashik West Forest Department in Naigaon Valley Another leopard got stuck)

पण वनविभागाच्याच्या सापळ्यात अडकून बसला आहे. नायगाव खोरे बिबट्या हल्लाने अन् त्यांच्या रात्रीवेळेस दर्शन भयभीत झालेल्या शेतकरी कुटुंबातील सर्वांना दुसरा बिबट्या तात्काळ पिंजऱ्यात आल्याने जीव भांड्यात पडला आहे.

नाशिक पश्चिम वनविभागाचा गस्ती पथकाने दोन बिबट्यांना रेक्यू केले आहे. सोमवारी( ता.9 )ला शेतकरी त्र्यंबक भांगरे यांच्या सोयाबीन व ऊसाच्या क्षेत्रालगत पहिला बिबट्या पकडला.

त्यानंतर सिन्नर वनविभागाचे कर्मचारी संजय गिते अनिल साळवे यांच्या पथकाने मंगळवारी (ता.10) ला सायंकाळी सहा दुसरा पिंजरा उभारला. पहिला बिबट्या पिंजऱ्यात अडकला नंतर दोन बिबटे त्याला सोडविण्यासाठी प्रयत्न करत होते.

भांगरे परिवाराने संगितले. रात्री आठच्या सुमारास पिंजरा भोवती बिबट्या डरकाळीचा आवाज आला. त्यामुळे पांदीचा ओहोळ भागात घबराट निर्माण झाली.वनविभागाच्या कर्मचारी यांनी सुचना दिल्यानंतर ह्या भागात शिवार शांतता पसरली.

रात्री दोन वाजेच्या सुमारास बिबट्याने पिंजऱ्यात जोडीदार असेल या हेतूने शोध शोध केली, त्यात अडकून पडला. सकाळी सहाच्या सुमारास शेतकरी त्र्यंबक भांगरे विशाल भांगरे सागर भांगरे मनोज भांगरे रमेश जेजूरकर बापू जेजूरकर यांच्या झेप सामाजिक कार्यकर्ते यांनी वनविभागाला पिंजरा ओहोळ तून बाहेर काढण्यासाठी मदत केली आहे.

Leopard
Nashik Leopard News : नायगाव खोरेत वनविभागाच्या सापळ्यात अडकला बिबट्या

माझ्या भावाकडे सोडा ना....

नायगावचा भांगरे वस्ती अन् पादीचा ओहोळ बिबट्यांची मुक्त विहारांचा ठिकाण आहे. ह्या भागात मादी सह दोन बिछडे यांचा वावर वाढला. त्यात पहिला अन् दुसरा नर बिबट्या अडकला आहे. वन्यजीवांची मुक्त विहार करण्याची जोडी फुटली.

बिबट्याला सोडण्यासाठी बिबट्याने डरकाळ्या फोडल्या. दोन्ही नर बिबट्यांचे दर्शन डोळ्यात भरते. आज पकडलेला बिबट्या पिंजऱ्यातील दुश्य न्याहाळताना माझ्या भावाकडे सोडा...

डोळ्यातून सांगत तो डरकाळ्या देत होता. नायगावला चार ठिकाणी पिंजरे उभारले. त्यात दोन पिंजऱ्यातून बिबटे रेक्यू झाले. आता ह्या बछड्यांच्या आईला मादीला सापळ्यासाठी पिंजरा हवा आहे.

"पांदीचा ओहोळ ठिकाणी दोन बछडे पिंजरात अडकले. आम्हाला थोडं बर वाटत आहे. रात्रीला बिबट्याने खुप डरकाळ्या फोडल्या. ह्या बछड्यांची आई मादी वडील नर पण ह्या भागात आहे". - त्र्यंबक भांगरे, शेतकरी, नायगाव

"नायगाव ग्रामपंचायतीने बिबट्याचे सारखे हल्ले सुरू झाल्यानंतर सर्व बिबटे पडकडण्यात यावे असा ठराव दिला आहे. दोन बिबटे पिंजऱ्यात आल्यानंतर शांतता वाटते. पण अजून ते आहे दिसतात असे शेतकरी बांधवांचे म्हणणे आहे." - सुनिता शंकर पवार, सरपंच, नायगाव

"दोन बिछडे बिबटे रेक्यू केले आहे. भांगरे वस्ती ठिकाणी पुन्हा पिंजरा सापळा ठेवणार आहे."

- संजय गिते, वनरक्षक, नायगाव

"लखन शाळेत जात आहे. पण अजून बिबट्या हल्ल्यातील जखम भरली नाही. सर्व औषधे उपचारांचा खर्च आम्ही केला आहे. वनविभागाने मदत केली नाही."

-अजय सिंह, जखमी लखनचे वडील, नायगाव

फोटो सह... नायगाव (ता. सिन्नर) येथील शिवारात पांदीचा ओहोळातील शेतकरी त्र्यंबक भांगरे यांच्या शेतात वनविभागाच्या सापळ्यात अडकलेला दुसरा बिबट्या या ठिकाणी सलग दुसरा दिवशी बछडे वनविभागाने रेक्यू केले आहे.

Leopard
Leopard Attack : बिबट्याच्या हल्ल्यात ७ महिन्यांच्या चिमुकल्याला आईने दिले जीवदान!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com