Success Story : तरसाळीच्या पल्लवी जाधवची उत्तुंग भरारी; सहाय्यक विक्रीकर निरीक्षक पदाला गवसणी

Success Story
Success Storyesakal

वीरगाव : तरसाळी (ता. बागलाण)येथील पल्लवी जाधव हिने राज्य लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेत यशस्वीरीत्या उत्तीर्ण होऊन सहाय्यक विक्रीकर निरीक्षक पदाला गवसणी घातली. गावासह तालुक्यातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

तरसाळी येथील रहिवासी रमेश जाधव व रेवती जाधव या शिक्षक दाम्पत्याची पल्लवी मुलगी असून, ते सध्या नोकरीनिमित्त विंचूर (ता. येवला) येथे वास्तव्यास आहेत. पल्लवीने २०२० मध्ये राज्य लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षेत सहभाग घेतला होता. या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, पल्लवीने सहाय्यक विक्रीकर निरीक्षक परीक्षेत विभागात चौथी, तर कक्ष अधिकारी परीक्षेत दुसऱ्या क्रमांकावर येण्याचा बहुमान मिळविला. तिच्या यशाबद्दल तरसाळी ग्रामस्थांसह विविध सामाजिक संघटना, पदाधिकाऱ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.

हेही वाचा : मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार....

पल्लवीचे प्राथमिक शिक्षण विंचूर येथील प्राथमिक शाळेत झाले. माध्यमिक शिक्षण कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय, बारावीनंतर इंजिनिअरींगचे शिक्षण नाशिकच्या क. का. वाघ इंजिनिअरिंग कॉलेजमधून पूर्ण केले. त्यानंतर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करुन यश मिळवले. तरसाळी या गावातून आजपर्यंत पाच उच्चपदस्थ अधिकारी होऊन गेले. याच अधिकाऱ्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन तरुण पिढी मार्गक्रमण करीत आहे.

Success Story
Chicken shop : ‘गाव तिथे चिकन सेंटर’च्या माध्यमातून रोजगार निर्मीती; वर्षाला होतेय मोठी आर्थिक उलाढाल

''माझे काका पोलिस उपनिरीक्षक असल्यामुळे त्यांच्यासारखेच मला पण अधिकारी व्हायचे होते. त्यामुळे महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच काकांची प्रेरणा घेऊन अभ्यासाला सुरवात केली. माझ्या यशात आई- वडिलांचा सर्वात मोठा वाटा आहे. त्यांनी माझ्या कुठल्याच निर्णयाला विरोध केला नाही.''

- पल्लवी जाधव, सहाय्यक विक्रीकर निरीक्षक

Success Story
SAKAL Exclusive : कॉम्‍प्‍युटर, IT इंजिनिअरिंग ‘लई भारी..!’; अभियांत्रिकीला वाढले प्रवेश

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com