Nashik : Online भाजीपाला विक्रीतून विद्यार्थ्यांची कमाई!

Espalier Heritage students selling vegetables online.
Espalier Heritage students selling vegetables online.esakal

नाशिक : अनुभवातून शिक्षण देणाऱ्या इस्पॅलियर हेरिटेज स्कूलच्या आवारात विद्यार्थ्यांनी शेती करत विविध भाजीपाला पिकांचे उत्पादन घेतले. कोबी, मिरची, भेंडी यांसह झेंडूची फुलांची बाग फुलवत विद्यार्थ्यांनी शेतीचा प्रयोग यशस्वी करून दाखविला. एवढेच नव्हे तर पिकविलेला भाजीपाला पालकांना ऑनलाइन पद्धतीने विक्री करत आर्थिक उत्पन्नही मिळवले. (successful experiment of online vegetable selling by Espalier Heritage school students Nashik News)

Espalier Heritage students selling vegetables online.
Nashik Water Supply: शहरासाठी साडेतीनशे कोटींच्या पाणीपुरवठ्याचा सुधारित आराखडा

विद्यार्थ्यांनी स्वतः अनुभवातून शेतीची विविध कामे केली. शाश्वत शेतीचे धडे गिरवत विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती उत्पादनांची विक्रीची नवी व्यवस्थाही निर्माण केली. इस्पॅलियर हेरिटेज स्कूलमधील इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांनी शाळेच्या आवारात विविध भाजीपाला पिकांचे उत्पादन घेतले. पेरणीपासून ते विक्रीपर्यंतची सर्व कामे विद्यार्थ्यांनीच केले.

पिकविलेला भाजीपाल्याची विक्री करण्यासाठी विद्यार्थ्यांनी शेतामध्ये ऑनलाइन यंत्रणा निर्माण केली. झूम लिंकच्या माध्यमातून पालकांना भाजीपाला पिकांची माहिती देण्यात आली. तसेच, ज्या पालकांना भाजीपाला घ्यावयाचा आहे, त्यांच्याकडून ऑर्डर घेत त्यानुसार वजन करून पॅकिंग करून ठेवण्यात आले. स्कूल बसद्वारे विद्यार्थ्यांच्या माध्यमातून हा भाजीपाला पाठविण्यात आला. पालकांकडून पैसेही ऑनलाइनच्या माध्यमातूनच घेण्यात आले.

विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या या विक्री शॉपचे उद्‌घाटन औरंगाबादचे कृषिभूषण उस्मान बेग यांच्या हस्ते झाले. त्यांनी विद्यार्थ्यांना शेती विषयी मार्गदर्शन केले. शिक्षण अभ्यासक सचिन जोशी, शाळेच्या चेअरमन डॉ. प्राजक्ता जोशी यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला. या वेळी मुख्याध्यापिका अंकिता कुरिया, श्रीमती पियुषा, श्रीमती निशा यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

Espalier Heritage students selling vegetables online.
Nashik : द्राक्षाच्या गोड शिवारात, तिखट मिरचीचा तडका!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com