नाशिक : 73 वर्षीय आजींवर 'टॅव्‍ही’ शस्‍त्रक्रिया यशस्‍वी

heart surgery
heart surgery esakal

नाशिक : श्‍वास घेण्यास त्रास होत असल्‍याने ७३ वर्षीय आजींना हालचाल करणेही कठीण झाले होते. वैद्यकीय तपासणीत हृदयाच्‍या झडपेविषयक कॅलिसिफिक एओर्टिक स्टेनोसिसचे (Calcific aortic stenosis) निदान झाले. रुग्‍णांच्‍या नातेवाइकांशी चर्चा केल्‍यानंतर शस्‍त्रक्रिया करण्याचे ठरले. इगतपुरी येथील एसएमबीटी (SMBT) मेडिकल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस ॲन्ड रिसर्च सेंटरमध्वा ट्रान्स- कॅथेटर एऑर्टिक व्हॉल्व्ह रिप्लेसमेंट (Transcatheter aortic valve replacement - TAVR)ची यशस्‍वी शस्त्रक्रिया करण्यात आली. यातून आजीला जगण्याची नवी उमेद मिळाली आहे.

कॅलिसिफिक एओर्टिक स्टेनोसिसचे निदान झाले, तेव्‍हा आजींचा रक्तदाब सतत अधिक होत होता. त्यांचे हृदय क्षमतेपेक्षा निम्म्या क्षमतेने रक्त पुरवत होते. हृदयाच्या रक्तवाहिन्या हळूहळू अरूंद होऊ लागल्याने हृदय कमकुवत होऊ लागले होते. रुग्णावर ओपन हार्ट सर्जरी करणे धोकादायक असल्‍याचा निष्कर्ष डॉक्‍टरांनी काढला.
एओर्टिक व्हॉल्व्ह रिप्लेसमेंट एओर्टिक स्टेनोसिस म्हणजे हृदयाची झडप अकुंचन पावणे. एओर्टिक व्हॉल्व्हमुळे हृदयाकडून संपूर्ण शरीराकडे रक्तपुरवठा सुरळीत केला जातो, पण हा प्रवाह कमकुवत होऊ लागल्याने रक्ताचा पुरवठा कमी होऊ लागतो. अशावेळी रुग्णामध्ये श्वास घेण्यास त्रास होणे आणि डोळ्यासमोर अंधारी येणे यासारखी लक्षणे दिसू लागतात. अतिशय गंभीर स्वरूपाच्या सिम्टमॅटिक एऑर्टिक स्टेनोसिसमध्ये औषधांचाही उपयोग होत नाही. त्‍यामुळे आजींना केवळ औषधांनीच उपचार करणे जीवाला धोकेदायक होते. त्‍यामुळे ट्रान्स- कॅथेटर एऑर्टिक व्हॉल्व्ह रिप्लेसमेंट (टॅव्ही)ची शस्त्रक्रिया इगतपुरी येथील एसएमबीटी मेडिकल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस ॲन्ड रिसर्च सेंटरमध्ये करण्यात आली.

heart surgery
कोरोना कायमस्वरूपी राहू शकत नाही - विषाणूशास्त्रज्ञ

शस्‍त्रक्रियेत त्यांची ही झडप हायड्रा ट्रान्सकॅथेटर एऑर्टिक व्हॉल्व्हच्या पद्धतीने डॉ. अनमोल सोनवणे यांनी एसएमबीटी इन्स्टिट्यूटचे डॉ. गौरव वर्मा आणि त्यांच्या कौशल्यपूर्ण चमूने यशस्वीपणे दुरूस्त केली आहे. नाशिक जिल्ह्यातील टॅव्हीच्या माध्यमातून उपचार करण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे नमूद करताना आता, एऑर्टिक स्टेनॉसिसमुळे त्रस्त रुग्णांना नवी दिशा मिळणार असल्‍याचे डॉक्‍टरांनी सांगितले.

अशी होते टॅव्‍ही शस्‍त्रक्रीया

टॅव्हीच्या ९० टक्के प्रकरणांमध्ये जांघेतून उपचार केले जातात. आणि ही शस्त्रक्रिया करताना केवळ तोच भाग बधीर केला जातो. संपूर्ण कालावधीत रुग्ण संपूर्ण शुद्धीत असतो. परिणामी, किमान वेळ आयसीयूत राहून रुग्‍णालयातून रुग्णाला लवकर घरी जाता येते. टॅव्ही प्रक्रियेत पायातील रक्तवाहिनीच्या माध्यमातून एक झडप हृदयातील जुन्या झडपेवर बसवली जाते. ही झडप पेशींपासून तयार केलेली असल्यामुळे रक्त पातळ करण्याची औषधे काही महिनेच द्यावी लागतात, असेही डॉक्‍टरांनी सांगितले.

heart surgery
कोरोना लस घेणाऱ्यांना आयसीयू व व्‍हेन्‍टीलेटरची गरज भासणार नाही - राजेश टोपे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com