
Nashik News : गर्भवतीवर अर्धांगवायूच्या झटक्यानंतर यशस्वी उपचार
नाशिक : प्रसूतीची वेळ जवळ आलेली असताना चोवीसवर्षीय गर्भवती महिलेस अर्धांगवायूचा झटका आला. या महिलेला (Women) नवजीवन देण्यात वोक्हार्ट हॉस्पिटलचे मेंदूविकार तज्ज्ञ
डॉ. विशाल सावळे व टीमला यश आले आहे. (Successful treatment after paralytic stroke in pregnant women by doctor nashik news)
नवीन पाहुणा येणार असल्याने औरंगाबाद येथील डॉक्टर जोडपे आनंदी होते. परंतु प्रसूतीची वेळ जवळ आलेली असताना चोवीस वर्षीय गर्भवती महिलेला अचानक ताप आल्याने लोणी येथील रुग्णालयात दाखल केले.
यावे ळी गर्भवतीस अर्धांगवायूचा झटका आल्याने सतत आकडी येऊन बेशुद्ध होत होत्या. तसेच डेंगीचे निदान झालेले असताना प्रसूतीदेखील करण्यात आली. मात्र श्वासोच्छवासाच्या त्रासामुळे बाळ दगावले.
रुग्णाची परिस्थिती खालावल्याने तिला नाशिकच्या वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. डेंगी सतत येणारी आकडी आणि बेशुद्धावस्थेतच असल्याने महिला रुग्णाला अतिदक्षता विभागात दाखल केले. महिलेच्या प्लेटलेट्स ४० हजाराहून कमी झाल्याचे निदर्शनात आले. तसेच प्रेस सिंड्रोमचे निदानही झाले होते.
हेही वाचा : हिंडेनबर्ग अहवालाचा फटका भाजपला भविष्यात बसणार?
अशा संघर्षमय परिस्थितीतून रुग्णालयातील मेंदूविकार तज्ज्ञ डॉ. विशाल सावळे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला रुग्णावर यशस्वी उपचार करण्यात आले आहे. पहिले दोन दिवस कोमात राहिल्यानंतर रुग्णाने तिसऱ्या दिवशी उपचारांना प्रतिसाद दिला. महिलेच्या लघवीतून रक्त जात असल्याने हेमट्युरियाचे निदानासोबत व्हायरल न्यूमोनिया आढळून आला.
सातव्या दिवशी तिचा व्हेंटिलेटर काढण्यात आला असून रुग्णावर फिजीओथेरेपीद्वारे शारीरीक हालचाली पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. दहाव्या दिवशी रुग्ण स्वतःच्या पायावर चालायला लागल्यानंतर तिला घरी सोडल्याची माहिती डॉ. सावळे यांनी दिली.