राज्यमंत्र्यांच्या अचानक भेटीने जलसंपदा विभागात तारांबळ! विभागाचा कारभार चव्हाट्यावर | Bacchu Kadu | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

bacchu kadu

राज्यमंत्र्यांच्या अचानक भेटीने जलसंपदा विभागात तारांबळ | Nashik

सिडको (नाशिक) : जलसंपदा विभागाचे राज्यमंत्री बच्चू कडू (bacchu kadu) यांनी मंगळवारी (ता. २३) अचानक भेट दिली. या वेळी मुख्य अधिकाऱ्यांसह कार्यकारीअभियंता कार्यालयात गैरहजर होते. त्यामुळे जलसंपदा विभागातील अधिकाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली.

बच्चू कडूंनी अधिकाऱ्यांना धरले धारेवर

या वेळी कडू यांना कार्यालयीन कामकाजात अनियमितता आढळल्याने त्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. त्यांनी विचारलेल्या प्रश्‍नांना उत्तर देताना अधिकाऱ्यांची तारांबळ उडाली. गैरहजर असलेले मुख्य अभियंता चव्हाण आणि कार्यकारी अभियंता भामरे यांचे दोन दिवसांचे वेतन कपात केले. या वेळी घेतलेल्या झाडाझडतीत जलसंपदा विभागाचा भोंगळ आणि संशयास्पद कारभार चव्हाट्यावर आला. कामांच्या, हजेरीच्या नोंदी ठेवल्या जात नसल्याचे उघड झाले. श्री. कडू यांनी अभियंता अलका अहिरराव यांच्या कामावरही नाराजी व्यक्त केली.

हेही वाचा: Nashik | शहरात हत्यांचे सत्र सुरूच, RTO ऑफिसजवळ तरुणाची हत्या

हेही वाचा: कृषी कायदे मागे घेतले, पण धोरणांचे काय? मंत्री बच्चू कडूंचा सवाल

loading image
go to top