नाशिक- शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्यानंतर भारतीय जनता पक्षात प्रवेश केलेल्या सुधाकर बडगुजर यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी क्लीन चीट दिली आहे. भाजपने बडगुजर यांच्यावर टीका केली हे खरे आहे मात्र, सलीम कुत्ता प्रकरणात त्यांच्यावर दाखल गुन्हा संदर्भात कुठलीच कारवाई झालेली नसून ते निर्दोष असल्याचे स्पष्टीकरण मुख्यमंत्री यांनी दिले. शिवसेनेत (उबाठा) असतानाच त्यांना क्लिनचीट मिळाल्याचे सांगताना फडणवीस यांनी त्यांना आता भाजपच्या नितीनियमाप्रमाणे वागण्याचा सल्ला दिला.