esakal | लोकरी माव्यामुळे उस कडवट; निफाड तालुक्यातील शेतकरी हवालदिल
sakal

बोलून बातमी शोधा

लोकरी माव्यामुळे उस कडवट; निफाड तालुक्यातील शेतकरी हवालदिल

लोकरी माव्यामुळे उस कडवट; निफाड तालुक्यातील शेतकरी हवालदिल

sakal_logo
By
दीपक अहिरे


पिंपळगाव बसवंत (जि. नाशिक) : हवामानातील सततच्या बदलामुळे निफाड तालुक्यातील गोदाकाठ परिसरातील उस पिकावर मोठ्या प्रमाणात लोकरी माव्या रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. परिणामी, शेतकऱ्यांसाठी हुकमी व चांगल्या मोबदल्याचे पीक असलेल्या उसावरील संकटाने शेतकरी हवालदिल झाले आहेत. उसतोड, दर यासह अनंत अडचणींनी ग्रासलेल्या साखर उद्योगासमोर आणखी एक संकट उभे ठाकले आहे. साखरप्रमाणे गोड उत्पन्न देणाऱ्या ऊसाची चव लोकरी माव्यामुळे काहीशी कडवट झाली आहे. (sugarcane crop in Niphad taluka has been affected by wooly aphid Agriculture News)


निफाड तालुक्यात यंदा ८ हजार एकरवर आडसाली उसाचे क्षेत्र आहे. सात लाख टनाचे उत्पादन यंदा अपेक्षीत आहे. रानवड साखर कारखाना सुरू होण्याची चिन्हे असल्याने उस उत्पादकांना दिलासा मिळाला आहे. पण, लोकरी माव्याचा प्रादुर्भाव त्या आनंदावर विरजण टाकत आहे. उसाची पाने पांढरी पडू लागली आहेत. ही कीड उसातील हरितरस शोषून घेत असल्याने वाढ खुंटत आहे. लोकरी माव्याच्या विळख्याने शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात आर्थिक हानी होण्याची भिती आहे. लोकरी माव्याशी झुंज देण्यासाठी रामबाण औषध नसल्याने शेतकरी हतबल झाले आहे.


निफाड तालुक्यातील उसउत्पादक पाच-सहा वर्षांपासून लोकरी माव्यामुळे मेटाकुटीला आला आहे. यंदाही प्रतिकुल हवामानाबोरबरच मावा प्रार्दुभावाचे संकट आ वासून असल्याने उत्पादकाबरोबरच साखर उद्योगातही अस्वस्थता परसली आहे. अजून हंगाम सुरू होण्यास तीन ते चार महिने अवधी आहे. पाणी, खते, मशागतीची कामे सुरळीत झाल्याने गोदाकाठ परिसरात यावर्षी उसाचे पिक जोमात बहरले आहे. पण, पांढऱ्या शुभ्र लोकरी किडीने शेतकरी हादरले आहेत.

हेही वाचा: नाशिकच्या सिक्युरिटी प्रेसच्या सुरक्षेला छेद; 5 लाख गायब


गोदाकाठची जमीन क्षारपड असल्याने आम्हाला उसाशिवाय दुसरे पिक घेता येत नाही. शेतकऱ्यांनी घेतलेल्या मोठ्या मेहनतीमुळे यंदा उसाचे पिक बहरले आहे. पण, लोकरी माव्याने दृष्ट लावली आहे. उत्पादन घटण्याची भिती आहे.
- उस उत्पादक, करंजगाव

ढगाळ व पावसाळी वातावरणामुळे उसाच्या काही क्षेत्रावर लोकरी माव्याने आक्रमण केले आहे. त्या क्षेत्रात नैसर्गिक परभक्षक कीटकांची जोपासना करावी. अधिक प्रादुर्भाव असेल तेथे कीटकनाशकांची फवारणी करावी.
- बी. जी. पाटील, तालुका कृषी अधिकारी, निफाड

(sugarcane crop in Niphad taluka has been affected by wooly aphid Agriculture News)

हेही वाचा: पंचवटी, नाशिक रोडवरून भाजपमध्ये धूमशान; पक्षांतर्गत वाद

loading image