esakal | नाशिक रोड, पंचवटीवरून भाजपमध्ये धूमशान; पक्षांतर्गत बंड होण्याची शक्यता
sakal

बोलून बातमी शोधा

bjp

पंचवटी, नाशिक रोडवरून भाजपमध्ये धूमशान; पक्षांतर्गत वाद

sakal_logo
By
विक्रांत मते

नाशिक : प्रभाग समिती सभापतिपदाच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची वेळ जवळ येत असताना भाजपमध्ये पक्षांतर्गत वाद निर्माण झाला आहे. माजी आमदार बाळासाहेब सानप यांच्या समर्थकांना पंचवटी व नाशिक रोडमध्ये उमेदवारी देण्याच्या हालचाली सुरू झाल्याने भाजपमध्ये विरोधाचे वारे वाहू लागले आहे. सिडको विभागात शिवसेनेच्या सुवर्णा मटाले यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाले आहे, तर सातपूरमध्ये पुन्हा एकदा मनसेला संधी मिळणार आहे. (Ward-Committee-Chairman-Election-Dispute-bjp-marathi-news-jpd93)

सिडकोत शिवसेनेच्या मटाले, सातपूरमध्ये मनसेला संधी

मार्च महिन्यात मुदत संपुष्टात आलेल्या सहा प्रभाग समित्यांच्या सभापतिपदासाठी येत्या १९ जुलैला ऑनलाइन निवडणूक होणार आहे. पंधरा जुलैला अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत असल्याने महापालिकेचे राजकीय वातावरण या निमित्त पुन्हा एकदा ढवळून निघाले आहे. नव्याने नियुक्त होणाऱ्या सभापतींचा कार्यकाळ सहा महिन्यांसाठी असला तरी जानेवारी २०२२ मध्ये सार्वत्रिक निवडणुका असल्याने मतदारांसमोर विकासकामांच्या माध्यमातून पोहचण्याची संधी मिळणार असल्याने अनेक जण इच्छुक आहे. सर्वाधिक भाजपचे नगरसेवक असलेल्या पंचवटी प्रभाग समितीमध्ये माजी आमदार बाळासाहेब सानप यांचे चिरंजीव मच्छिंद्र सानप यांना उमेदवारी देण्यासाठी प्रयत्न सुरू झाल्याने भाजपमध्ये नाराजांचा मोठा गट सक्रिय झाला आहे.

पक्षांतर्गत बंड होण्याची शक्यता

पूनम सोनवणे व रुची कुंभारकर यांनीदेखील उमेदवारी अर्ज घेतल्याने येथे पक्षांतर्गत बंड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नाशिक रोड मध्ये निधनामुळे शिवसेनेचे संख्याबळ घटल्याने भाजप व शिवसेनेचे संख्याबळ समसमान झाले आहे. त्यामुळे चिठ्ठी पद्धतीने सभापती निवडला जाण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीचे जगदीश पवार यांना महाविकास आघाडीच्या वतीने संधी मिळण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. भाजपकडून सानप समर्थक सुमन सातभाई यांना उमेदवारी दिली जाणार असल्याने या नावावरून देखील भाजपमध्ये खदखद निर्माण झाली आहे.

सातपूरमध्ये मनसेची भूमिका महत्त्वाची

सिडकोत शिवसेनेचे बहुमत असल्याने सभापतिपदासाठी सुवर्णा मटाले यांचे नाव निश्‍चित झाले आहे. सातपूरमध्ये मनसेची भूमिका महत्त्वाची ठरणार असल्याने येथे पुन्हा भाजपकडून मनसेच्या उमेदवाराला पाठिंबा देण्यावर एकमत झाल्याचे बोलले जात आहे. पूर्व प्रभाग समितीमध्ये भाजपचे संख्याबळ असल्याने येथे भाजपचाच सभापती होईल. अनिल ताजनपुरे किंवा डॉ. दीपाली कुलकर्णी या दोघांपैकी एका नावावर निश्‍चिती होईल. दोघेही आमदार देवयानी फरांदे समर्थक असल्याने फरांदे सांगतील ते नाव निश्‍चित होईल. पश्‍चिम प्रभाग समितीमध्ये महाविकास आघाडीचे संख्याबळ असल्याने येथे कॉंग्रेसला संधी मिळेल.

हेही वाचा: लग्नपत्रिकेवरून 'लव्ह जिहाद'चा आरोप; लग्न मोडण्याची वेळ

हेही वाचा: गाडीच्या बोनेटवर चढला मोठा साप; तरीही तब्बल 2 किमीचा प्रवास

loading image