esakal | ग्रामीण अर्थव्यवस्थेला मिळतोय बूस्ट! ऊसतोड कामगारांच्या आगमनाने गजबजला निफाडचा गावकूस
sakal

बोलून बातमी शोधा

3Ustod_Kamgar.jpg

ऊस उत्पादक शेतकरी अधिच रान मोकळे करण्यासाठी धावपळ करताना दिसत आहेत. दरम्यान, पुढील चार ते पाच महिन्यांसाठी निफाडचा विशेतः ग्रामीण भागात आलेल्या ऊसतोड कामगारांच्या तांड्यामुळे निफाडच्या गावकुसातील छोटे व्यावसायिकांना ‘आच्छे दिन’ आले आहेत.

ग्रामीण अर्थव्यवस्थेला मिळतोय बूस्ट! ऊसतोड कामगारांच्या आगमनाने गजबजला निफाडचा गावकूस

sakal_logo
By
माणिक देसाई

निफाड (नाशिक) : पश्चिम महाराष्ट्रातील उसाच्या भावावरून रणकंदन सुरू असताना निफाड तालुक्यात ऊसतोडीचा हंगाम सुरू होऊन महिना उलटला आहे. नगर जिल्ह्यातील कोपरगाव, कोळपेवाडी, संगमनेरसह जिल्ह्यातील कादवा, द्वारकाधीश कारखान्याचे उसतोड कामगार जिल्ह्यातील गावागावांत डेरेदाखल झाल्याने निफाडचा गावगाडा ऊसतोड मजुरांनी गजबजू लागला आहे. यामुळे ग्रामीण अर्थकारणाला बूस्ट मिळाला आहे.

बैलजोडीसह कुटुंबकबिला घेऊन दाखल

निफाड तालुक्याच्या गोदाकाठ भागात सर्वाधिक उसाचे क्षेत्र असल्यामुळे जिल्ह्यासह अन्य भागातील साखर कारखान्यांच्या उसतोड कामगारांच्या टोळ्या आपल्या बैलजोडीसह कुटुंबकबिला घेऊन दाखल झाल्या आहेत. निफाड सहकारी साखर कारखाना आणि रानवड साखर कारखाना केजीएस शुगर कारखाना बंद असल्यामुळे संबंधित कारखान्यांनी सर्वाधिक ऊस आपल्या कारखान्याला मिळावा म्हणून चाळीसगाव, जळगाव, बीड, नगर जिल्ह्यांतील उसतोड कामगारांच्या टोळ्या गोदाकाठच्या भागात उतरवत ऊसतोडणीस प्रारंभ केला आहे.

हेही वाचा > ३० क्विंटल कांदा घेऊन तोतया व्यापारी फरारी; कधी थांबणार शेतकऱ्याची फसवणूक?

छोटे व्यावसायिकांना ‘आच्छे दिन’

कोरोनामुळे पूर्वीचा साडेपाच हेक्टर आणि आताच साडेपाच, असा अकरा हजार हेक्टरवर ऊस तोडणीस आहे. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी अधिच रान मोकळे करण्यासाठी धावपळ करताना दिसत आहेत. दरम्यान, पुढील चार ते पाच महिन्यांसाठी निफाडचा विशेतः ग्रामीण भागात आलेल्या ऊसतोड कामगारांच्या तांड्यामुळे निफाडच्या गावकुसातील छोटे व्यावसायिकांना ‘आच्छे दिन’ आले आहेत.

हेही वाचा > लिफ्ट देण्याच्या बहाण्याने करायचे लूटमार; मुंबईतील संशयिताच्या नाशिक पोलिसांनी आवळल्या मुसक्या

loading image
go to top