Nashik | पाेलिस मुख्यालयातील तरुण शिपायाची गळफास घेऊन आत्महत्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Suicide by police constable headquarters

Nashik | पाेलिस मुख्यालयातील तरुण शिपायाची गळफास घेऊन आत्महत्या

नाशिक : आडगाव येथील ग्रामीण पाेलिस मुख्यालयातील तरुण पाेलिस शिपायाने गळफास घेऊन आत्महत्या केली. आडगाव पाेलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नाेंद करण्यात आली आहे.

अक्षय आंधळे (वय २६, रा. मूळ रा. ठाणगाव, ता. सिन्नर, सध्या रा. आडगाव पाेलिस मुख्यालय) असे मृत कर्मचाऱ्याचे नाव आहे. मृत अक्षय हा २०१८ च्या भरती सत्रातील कर्मचारी हाेता. त्याची नेमणूक आडगाव पाेलिस मुख्यालयात हाेती. तसेच ताे पत्नीसह येथे राहत हाेता.

हेही वाचा: लोंबकळणाऱ्या वीजतारांमुळे शेतकऱ्यांचे जीव टांगणीला

रविवारी (ता. १४) दुपारी त्याने काहीतरी कारणातून पोलिस मुख्यालयातील बिल्डिंग नंबर १० मधील रुम नंबर ९ येथे गळफास घेत जीवन संपवले. गेल्या वर्षभरापूर्वीच त्याचा विवाह झाला हाेता. तसेच सात ते आठ दिवसांपूर्वीच त्याची पत्नी दिवाळी निमित्त माहेरी गेली हाेती. ताे चांगल्या स्वभावाचा होता, अचानक त्याने हे पाऊल का उचलले, याबाबत आता आडगाव पाेलिस तपास करत आहेत.

हेही वाचा: आरोग्यवर्धक कवठाची झाडे बहरली; नागरीकांना भुरळ

loading image
go to top